2 हजार भरा डीपीआर रिपोर्ट मिळवा - पालिकेचा नवा उपक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2016

2 हजार भरा डीपीआर रिपोर्ट मिळवा - पालिकेचा नवा उपक्रम

मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेचे 51 हजार करोड़ विविध बँकामधे पडून असताना पालिकेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी डीपीआर रिपोर्ट मधून पैसा कमवण्याची नवा उपक्रम सुरु केला आहे. या नव्या उपक्रमाद्वारे एका सिटीएस क्रमांकाच्या माहिती साठी 2 हजार रुपये घेतले जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या डीपी विभागाद्वारे गुरुवारी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत डीपीआर रिपोर्टस ऑनलाइन मिळणार  असल्याची माहिती बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटचे मुख्य अभियंता विनोद चिटोरे यांनी दिली. पालिकेच्या वेबसाईटवरून एसआरडीपी 91 या लिंकवर गेल्यास ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी लोकांना लॉगइन करावे लागणार आहे. नुसता डीपीआर पाहण्यास शुल्क लागणार नसले तरी डीपीआर रिपोर्ट मिळवण्यासाठी प्रती सिटीएस क्रमांक 2 हजार शुल्क भरावे लागणार असल्याचे चिटोरे यांनी सांगितले.

सध्या 1991 च्या डीपी मधील रिमार्क यावर उपलब्ध असले तरी 17 जून पासून नव्या डीपीमधील रिमार्क लोकांना उपलब्ध होणार आहेत. ऑनलाइन सेवेद्वारे वार्ड, आरक्षण, रोड, झोन तसेच बफर झोनची माहिती मिळणार आहे. ही सुविधा ऑनलाइन होण्या आधी 300 ते 500 रुपयात 15 दिवसात डीपीआर रिपोर्ट सामान्य लोकांना उपलब्ध होत होता आता मात्र अधिक माहिती असलेले डीपीआर रिपोर्ट त्वरित मिळणार असल्याने 2 हजार रुपये घेणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या डीपीआर रिपोर्टमुले लोकांना घरे घेण्यास अडचणी येणार नसल्याचे चिटोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad