छापील किमतीपेक्षा जास्त दराने पाण्याची बाटली विकणाऱ्या 256 दुकांनावर खटले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2016

छापील किमतीपेक्षा जास्त दराने पाण्याची बाटली विकणाऱ्या 256 दुकांनावर खटले

मुंबईदि. 24 : छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद पाणी बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील विविध सिनेमागृहेमॉलरेल्वे व बस स्थानकेफूड मॉलहॉटेल यांच्यावर वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई करून एकूण 256 आस्थापनांवर (दुकाने) खटले दाखल केले आहेत. मागील आठवडाभरात विशेष मोहिम राबवून यंत्रणेने ही कारवाई केली आहे.

पॅकबंद वस्तूंची (आवेष्टित) छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यंत्रणेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्यात विविध ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानंतर विशेष पथकाने केलेल्या तपासणीमध्ये पॅकबंद पाणी बाटलीची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या 233छापील किमतीत खाडाखोड केल्याप्रकरणी 3आवश्यक माहिती न छापणाऱ्या 9विहित आकारमानात माहिती न दिलेल्या 1 व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 10 अशा एकूण 256 आस्थापनांवर कारवाई केली. 

पॅकबंद वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याच्या घटना आढळून आल्यास त्याविरुद्ध वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष क्रमांक 022-22886666 आणि व्हॉट्सअप क्रमांक 9869691666 किंवा ई मेल – dclmms_comlaints@yahoo.com तसेच यंत्रणेच्या फेसबुक पेज (Legal Metrology Maharashtra Consumer grievances) या ठिकाणी तक्रार करण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad