2018 पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2016

demo-image

2018 पर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारणार

मुंबईदि. 27 : केंद्र सरकारने राज्यातील  12 हजार कि. मी. लांबीच्या  रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात तत्वत: रुपांतर करण्यास तसेच 67 हजार कोटी रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्याचे खड्डेमुक्त महाराष्ट्रकाँक्रीट रस्तेयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


राज्य शासनाने राज्यातील 13 हजार कि. लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्याचा तर रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 97 हजार कोटी रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यापैकी 12 हजार कि.मी. लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यास तर रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी 67 हजार कोटी रुपयांच्या कामास मंजूरी दिली असून उर्वरित 30 हजार कोटी रुपयांच्या कामांना पुढील टप्प्यात मंजूरी देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व राज्य महामार्गांचा समावेश आहे. याबद्दल केंद्रीयमंत्री गडकरी यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांनी यावेळी आभार मानले.
            
पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मजबुतीकरणासाठी 2 हजार कोटीराष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी 47 हजार कोटीराष्ट्रीय महामार्ग काँक्रीटीकरणासाठी 15 हजार कोटीराष्ट्रीय महामार्ग नुतनीकरणासाठी 1 हजार कोटीराष्ट्रीय महामार्ग सुरक्षा व भूसंपादन व इतर कामांसाठी 2 हजार कोटी अशी एकूण 67 हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. या रकमेतून येत्या 2 वर्षात राज्यातील 14 हजार कि. मी. लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
            
राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे 6 हजार कि. मी. लांबीचेमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेमार्फत 4 हजार कि. मी. लांबीचे व चौपदरी रस्त्यांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणमार्फत कामे केली जाणार आहेत.  या रस्त्यांची सर्व कामे डिसेंबर 2016 मध्ये सुरु करुन ती डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. यामुळे राज्यातील 12 हजार कि.मी. लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग काँक्रीटचे होणार असून त्यावर पुढील 20 वर्षे खड्डे पडणार नसल्याने खड्डेमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.
         
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 47 हजार  कोटी रुपयांच्या किंमतीचे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनींचे भूसंपादन डिसेंबर 2016 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून हे प्रकल्प सुरु करण्याचे नियोजन करण्यात आहे. यामध्ये मुंबई-पुणे-सातारामुंबई-गोवामुंबई-नाशिक,जेएनपीटी-उरणनाशिक-पुणेनाशिक-नागपूर या मार्गांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील महत्वाची पर्यटन स्थळे,औद्योगिक क्षेत्रे व कृषि उद्योग केंद्र स्थळांचा अभ्यास करुन त्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी 30 हजार कोटींची दुसऱ्या टप्प्याची योजनाही केंद्र सरकारला सादर  केली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages