तलाठी, लिपिक संवर्गातील 1583 पदांसाठी सप्टेंबरमध्ये परीक्षा - राज्यमंत्री संजय राठोड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2016

तलाठी, लिपिक संवर्गातील 1583 पदांसाठी सप्टेंबरमध्ये परीक्षा - राज्यमंत्री संजय राठोड

मुंबईदि. 22 : लिपिक-टंकलेखक संवर्गातील 521 रिक्त पदांसाठी रविवार 4 सप्टेंबर रोजी तर तलाठी संवर्गातील 1062 पदांसाठी रविवार 11 सप्टेंबर 2016  रोजी  परीक्षा घेण्यात येणार आहे, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत मंत्रालयात  आयोजितबैठकीत राठोड बोलत होते. 


तलाठीलिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे भरल्यास महसूल विभागातील कामांमध्ये  आणखी गती येण्यास मदत होईल,असेही राठोड म्हणाले. यावेळी तलाठी सज्जा पुनर्रचना समितीच्या  शिफारशी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी  सादर करण्यात येणार असून यामूळे नवीन तलाठी सज्जांची निर्मिती व मंडळ अधिकारी कार्यालये निर्माण होणार असल्याने भविष्यात देखील तलाठीलिपिक-टंकलेखक संवर्गातील  अनेक  पदे निर्माण होतील व  ही पदे देखील पारदर्शक पद्धतीने भरण्यात येतील, असेही  श्री.राठोड  यांनी  सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad