मुंबई,दि. 27 : राज्य शासनाने सन 2015 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20 प्रख्यापित करण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात कलम 10 (ड) नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात कलम 3 (क) नुसार अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये नमुद केलेल्या सर्व संलेखावर मुद्रांक शुल्क देय ठरते. तसेच विभागीय कार्यालयांमध्ये मोठ्याप्रमाणावर कार्यकंत्राटे/विकसनकरार/टीडीआर हस्तांतरणाचे करार दाखल करण्यात येत असतात. या करारनाम्यांवर देय मुद्रांक शुल्क शासन जमा केले जाईल याची खात्री करण्याची जबाबदारी संबधित विभाग प्रमुखांवर या तरतूदीनुसार सोपविण्यात आली आहे. अशा दस्तांच्या नोंदणी ऐच्छिक असून याबाबत 5000 रुपयांपर्यंत असलेले मुद्रांक शुल्क फ्रॅकिंगद्वारे व त्यावरील रक्कमेच्या मुद्रांक शुल्काकरीता e-SBTR द्वारे भरणा करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात संबधित विभागास ग्रास प्रणालीद्वारे मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरुन घेण्यासाठी प्राधिकृत केले जाईल व त्यानंतर सर्व मुद्रांक शुल्क ग्रास प्रणालीद्वारे भरुन घेता येईल.
No comments:
Post a Comment