मुंबई / प्रतिनिधी - पावसाळयात मुंबईमधे पाणी तुंबल्याचे प्रकार होउन नागरीकाना त्रास सहन करावा लागत आला आहे. सत्ताधारी पक्ष शिवसेनेकडून मुंबईकर नागरिकांच्या अपेक्षा असताना खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांनी सहकार्य केल आणि नैसर्गिक आपत्ती नाही आली तर मुंबईत कमीत कमी पाणी तुंबेल असे वक्तव्य करत मुंबईमधे मोठा पाउस पडल्यास पाणी तुंबेल अशी अनपेक्षित कबुली दिली आहे. मुंबईमधील नालेसफाईचा दौरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला यावेळी पत्रकारांशी ठाकरे बोलत होते.
मुंबईमधील नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना अडचणित आली आहे. विरोधी आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला घेरल्यावर यावर्षी शिवसेनेने पाणी तुंबल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि आयुक्तांवर ढकलली होती. नालेसफाईमधे नाचक्की झाल्यावर शिवसेनेने यावर्षी नाले सफाईचा दौरा केला आहे. यावर्षी पुन्हा प्रशासनाची पाठ थोपटत प्रशांसन दक्ष असल्याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. प्रशासनावर नालेसफाईबाबत दबाव ठेवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
नालेसफाईबाबत वेळोवेळी आरोप करून शिवसेनेला कात्रीत पकडणाऱ्या भाजपाला क्लीन चिट देत भाजप आम्हाला दोषी धरत आहे अस वाटत नाही कारण ते वीस वर्ष आमच्या सोबत असल्याचे वाटत असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाच्या राजकारणात रस नसून त्यांनी राजकारणाचा गाळ काढत राहावा असा टोला उद्धव यांनी लगावला आहे. गेल्यावर्षी नालेसफाई चांगली झाली होती पण गाळ दुसरीकडे टाकला गेला नव्हता त्यामुले मुंबईत पाणी साचल अशी काबुली देत यावेळी पालिका आयुक्तानी अस होणार नाही याची खात्री दिली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत महापौर स्नेहल आंबेकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, पालिका आयुक्त अजोय मेहता, शिवसेनेचे नगरसेवक आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment