मुंबई / अजेयकुमार जाधव 26 May 2016
अरुणाचल प्रदेशातील मरन्या डोये ही महाड येथील साईं सिद्धी इंजिनीअरिंग कंपनी मधे कामाला असताना तिचा मृत्यु झाला आहे. मरन्या डोये हिचा खून झाला असताना याचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याने या खुनाचा तपास सिबीआय कडून करावा अशी मागणी प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे संपन्न पत्रकार परिषदेस मृत मरन्याची बहिण मरिना, अभिनेते अली खान, माय होम इंडियाचे दामोदर ड्यानियेट उपस्थित होते.
अरुणाचल प्रदेशातील डोये कुटुंबातील मरन्या, मार्टर, मरिना या तिन मुलिंनी दिल्ली येथून होटेल म्यानेजमेंटचा कोर्स केला होता. औद्योगीक प्रशिक्षणासाठी त्या महाड येथील विसावा रिसोर्टमधे दाखल होउन तेथेच प्रशिक्षण घेतले व नोकर्या करू लागल्या. याच दरम्यान एम.आय.डी.सी. येथील साईं सिद्धी इंजिनीअरिंग कंपनीच्या मालक सचिन पवार याने मरन्याला जास्त पगार देण्याचे सांगत आपल्या कंपनीमधे कामाला लावले. या कंपनीमधे काम करताना कंपनीमधे सफ़ेद पावडरचा कारभार सुरु असून मालकाकड़े या माध्यमातून भरपूर पैसा येत असल्याचे समजले होते. तशी माहिती मरन्याने नातेवाइकाना दिली होती अशी माहिती मरिना डोये हिने दिली.
मरन्याचा मृत्यु 26 एप्रिल रोजी झाला. मरन्याच्या मृत्यूची नोंद महाड एम्आयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यु अशी नोंद केली. मरन्याने जर गळफास लावला मग तिच्या हनुवटी जवळ मारहाण झाल्याच्या जखम कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत आम्ही तक्रार केल्यावर पोलिसांनी 302 क़लामा खाली गुन्हा नोंदवला. एफआयआर मधे पवार आणि त्याच्या इतर साथीदार आणि कुटुंबीयांचे नाव असताना फ़क्त सचिन पवार याला अटक करून जामिन मिळवुन देण्याचे काम पोलिसांनी केल्याचा आरोप मरीना हिने केला आहे.
मरन्या हिच्या मृत्युनंतर अरुणाचल प्रदेशमधे लाखो लोकांनी मेनबत्त्या घेवुन मोर्चा काढला होता. यावेळी मुख्यमंत्री व केंद्रीय गृह मंत्री किरेन रिजीजुजी यांनी या प्रकरणाची सिबिआय चौकशी करण्याचे जाहिर केले होते. मरन्या हिचा मृत्यु संशयास्पद झाला असल्याने या प्रकरणाची सिबीआय चौकशी करावी म्हणून सर्व संबंधित केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री पोलिस महासंचालक, महिला आयोग, मानवाधिकार आयोग, अनुसूचित जातीजमाती आयोग, तसेच अरुणाचल प्रदेश मधील मंत्री याना निवेदन दिल्याची माहिती मरीना हिने दिली आहे.
No comments:
Post a Comment