हंगामी कामगारांचे आझाद मैदानावर आमरण उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2016

हंगामी कामगारांचे आझाद मैदानावर आमरण उपोषण

मुंबई / ता. 24 may 2016
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील मुंबई, पुणे, अकोला आदि भागातील मिळून 20 हंगामी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पूर्व सुचना न देता गेल्या पाच  महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारिची वेळ आली असल्याने त्यांनी याविरोधात आझाद मैदानावर येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.



गेल्या 15 ते 20 वर्षापासून शासकीय नियमानुसार हंगामी पदावर काम करीत असताना शासकीय नियमानुसार नियमित वेतनावर 20 कर्मचारी कार्यरत होते. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून मंडळाने कुठलीही करवाई न करता तसेच लेखी सुचना न देता या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करुण शासकीय नियमानुसार या कामगारांचे वेतन बंद करुण त्यांच्यावर अन्याय केला आहे. या अघोर अन्यायामुळे या  20 कर्मचाऱ्यांवर  महागाई च्या काळात बेरोजगार व बेकारिचा आघात झाला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारिची वेळ आली आहे. याबाबत उपोषणकर्ता मिलिंद परुळेकर यांच्याशी चर्चा केली असता यासंदर्भात आम्हा कामगारांच्या वतीने मंडळाला विनविण्या करण्यात आल्या असून कामगार मंत्र्याना देखील लेखी पत्र देण्यात आलेले आहे मात्र याकडे मंडळ प्रशासन, शासकीय प्रशासन लक्ष देण्यास तयार नाहीत यासाठी यविरोधात लोकशाही मार्गाने आझाद मैदान येथे सोमवार (ता.23) मे 2016 रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आम्हा कामगारांस न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

याबाबत कामगार कल्याण मंडळ प्रशासन अधिकारी संजय कांबळे यांच्याशी चर्चा केली असता या संदर्भात कोणताही पत्र व्यवहार या कर्मचाऱ्यांनी मंडळाकडे केलेला नाही. परंतु हे मंडळाचे कामगार आहेत हे मंडळातील अधिकाऱ्यांना माहित आहेत. मात्र शासकीय अटी, शर्ती व  नियमानुसार या हंगामी कामगारांना कायमस्वरूपी करणे शक्य नाही. पण मंडळाच्या वतीने या कामगारांना पुन्हा कार्यरत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. असे कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad