मुंबई , दि .12, / प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी सुवर्ण रौफ्य महोत्सवी जयंती देशभरात मोठÎा उत्सहात साजरी झाली. जगभरातही साजरी होत आहे. ओबीसी समाजाच्यावतीनेही राज्यात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य जयंती साजरी करण्यात येणार आहे. आभाळा एवढे आंबेडकर, ओबीसींचे दीपस्तंभ या विषयावर व्याख्यानही होणार आहे, अशी माहिती या जयंती महोत्सवाचे आयोजक , बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष तथा आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ आंबेडकरी समूहच मोठÎा उत्साहाने साजरा करायचा. परंतु बाबासाहेब हे सर्व पीडित समाजांचे उद्गारकर्ते असल्याने आता ओबीसी समाजांच्यावतीनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंती मोठÎा धुमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय बंजारा समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांनी घेतला आहे. 16 मे रोजी मुलुंड येथीलदो.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथे हा उत्सव साजरा होणार आहे. आभाळा एवढे आंबेडकर ओबीसीचे दीपस्तंभ या विषयावर व्याख्यानही आयोजित केले आहे. सायंकाळी 6 ते 10 या वेळेत होणाऱया या कार्यक्रमात राजस्थानचे प्रसिद्ध नृत्य कालबेलियाचेसुद्धा प्रदर्शन होणार आहे. तसेच भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आणि भव्य मोटार सायकलची रॅली निघणार आहे.
बंजारा समाजाचे नेते आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली होणाऱया या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खासदार रामदास आठवले, माजी मंत्री नारायण राणे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार शिवमूर्ती, माजी खासदार संजय पाटील, रिपाइं नेते राजेंद्र गवई, माजी आमदार चरणसिंग सप्रा, स्वारीप नेते मनोज संसारे, नगरसेवक रामभाऊ तायडे, आय ए एस अधिकारी हर्षदीप कांबळे, समाजसेवक रमेश पाटील, कल्याणराव दळे, शंकर पवार आदी मान्यवर प्रुमुख अतिथी म्हणून उभे राहणार आहेत. तर व्याख्याते म्हणून भालचंद्र मुणगेकर, किसनराव राठोड, रमेश करके आणि मछिंद्र भोसले हे उपस्थित राहणार आहेत. आमदार हरिभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद आणि क्रांतिरत्न फाऊंडेशन यांच्या विद्यमाने हा महोत्सव होणार आहे.
No comments:
Post a Comment