मुंबई / प्रतिनिधी / दि. 28 May 2016
मुंबईतील बेरोजगारांना रोजगार मिळावा व सामान्य माणसाला सुविधा मिळावी या भावनेने भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी नमो टी स्टॉल उभारण्याची संकल्पना मांडली असल्याच्या बातम्या आज प्रसिध्द झाल्या आहेत. आम्ही त्यांच्या या भावनेचा आदर करतो. परंतू ही संकल्पना भाजपाची अधिकृत पक्ष संकल्पना नाही. ही त्यांनी व्यक्तीगत पातळीवर मांडलेली संकल्पना आहे. विशेषतः पंतप्रधानांचा फोटो अथवा नाव एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय योजनेसाठी वापरताना त्याचा एक राजशिष्टाचार पाळावा लागतो. तसा शिष्टाचार न पाळता ही संकल्पना त्यांनी व्यक्तीगत संकल्पनेतून मांडली. त्यामुळे अधिकृत स्टॉल अथवा अतिक्रमणाला अधिकृत करण्याचे प्रयत्न कोणी करून नये. विरोधकांनीही त्यावर राजकारण करू नये. भाजपा देशभर विकासाच्या अनेक योजना घेऊन काम करीत आहे. त्यामुळे या संकल्पनेसाठी वापरण्यात आलेले पंतप्रधानांचे नाव अथवा छायाचित्र याचे विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment