बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व परिचारिका कल्याणकारी संस्था यांच्यावतीने माजी परिचारिका अरुणा शानभाग यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम आज (दिनांक १८ मे, २०१६) सकाळी एम. एल. टी. सभागृह, राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय, परळ, मुंबई येथे साजरा करण्यात आला.
आमदार नीलम गोऱहे यांच्या मुख्य उपस्थितीत तसेच स्थानिक नगरसेवक संजय आंबोले, स्थानिक नगरसेविका हेमांगी (ममता) चेंबूरकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
अरुणा शानभाग यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालयाच्या परिचारिकांनी दिनांक १२ ते १८ मे, २०१६ या कालावधीमध्ये परिचारिका सेवा सप्ताह राबवला. या सप्ताहातील उत्कृष्ट परिचारिकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच परिचारिकांसाठी राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालयामध्ये निर्माण करण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन आणि ग्रंथालयाचे उद्घाटनही यावेळी आमदार नीलम गोऱहे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यायामशाळा आणि ग्रंथालयासाठी आमदार नीलम गोऱहे यांच्या आमदार निधीतून देखील लवकरच निधी प्राप्त होणार आहे.
अरुणा शानभाग यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्मृतिअंकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांनी केले. या कार्यक्रमात महापालिकेच्या विविध रुग्णालयांच्या परिचारिका सहभागी झाल्या होत्या.
No comments:
Post a Comment