नाले सफाईमुले कुर्ल्यातील घरे दुकाने नाल्यात कोसळली- रहिवाश्यांचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2016

नाले सफाईमुले कुर्ल्यातील घरे दुकाने नाल्यात कोसळली- रहिवाश्यांचा आरोप

मुंबई / प्रतिनिधी 25 May 2016
कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी येथे नाल्याखालची जमीन खचून नाल्याजवळील 30-35 घरे कोसळली आहेत. ही घरे नालेसफाईनंतर कोसळली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यानी केला आहे. नालेसफाईनंतर जमिन धसल्याने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.


पावसाळा तोंडावर आला असताना दरवर्षाप्रमाणे नालेसफाईची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असेच नाले सफाईचे काम कुर्ला पूर्व येथील शिवसृष्टी येथील नाल्याचे सुरु होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नाले सफाई सुरु असताना अचानक नाल्याची भिंत आणि बाजूची जमीन खचली आणि नाल्याबाजूची जवळपास 30-35 दुकाने आणि घरे कोसळली. या घरामधील आणि दुकानामधील सामान नाल्यामधे पडून रहिवाश्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

तिन चार दिवसापुर्वीच नाल्यावरील घरे आणि दुकाने कोसळणार असल्याची जाणीव येथील नागरिकांना झाली होती. या रहिवाश्यांचे पुनर्वसन पालिका करण्यास तयार आहे परंतू नागरीकानी याच ठिकाणी पुनर्वसन कारावे अशी मागणी केली असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका दर्शना शिंदे यांनी दिली. या ठिकाणी आमदार मंगेश कुडाळकर आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीही भेट दिली  आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad