सुरक्षित स्थळी रहिवाश्यांनी स्थलांतरित व्हावेः महापालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ३५४ च्या तरतुदी अन्वयेबृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खालील नमूद महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या इमारतींना 'अतिधोकादायक' घोषित करण्यात आले असून सदर इमारतीतील रहिवाशांना त्यांची निवासस्थाने रिक्त करण्याकरीता महापालिकेकडून वेळोवेळी कळविण्यात आले आहे. तथापि, काही इमारतींमध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. सदर इमारतींतील नागरिकांनी त्यांच्या इमारतीचा ताबा त्वरित सोडून, सदर इमारत स्वतःहून निष्कासित करावी. संबंधित इमारत कोसळून काही दुर्घटना घडल्यास व त्यात जीवित व वित्तहानी झाल्यास त्याबाबतची जबाबदारी इमारतीमध्ये वास्तव्य करणाऱया संबंधित नागरिकांची राहिल, त्याकरीता महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनातर्फे या निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे.
‘सी-१’ प्रवर्गातील धोकादायक इमारती – ‘ज्या तत्काळ रिक्त करुन जमीनदोस्त करणे आवश्यक आहेत‘ - त्यांची नावे व पत्ता पुढीलप्रमाणेः-
१) मिठाईवाला इमारत, नॉव्हेल्टी सिनेमासमोर, एल. टी. मार्केट, एम. एस. अली मार्ग, ग्रँट रोड, 'डी'विभाग; २) आग्रीपाडा बी. आय. टी. चाळ क्रमांक १ ते ४ आणि ९ व ११, नायर रुग्णालयासमोर, मुंबई सेंट्रल, 'ई' विभाग (पश्चिम); ३) मोमीनपुरा बी. आय. टी. चाळ क्रमांक १ व २, भायखळा (पश्चिम), 'ई'विभाग (पश्चिम); ४) रामगर्ड को-ऑप. हौ. सोसायटी, ३२ टेनामेंटस् / १० दुकाने, रुग्णालय आवार,रावळी कॅम्प, एन्टॉप हिल, 'एफ/उत्तर' विभाग; ५) इमारत क्रमांक ६, ३९६ टेनामेंटस्, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पूर्व), 'एन' विभाग; ६) इमारत क्रमांक १४ व १५, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी(पूर्व), 'एन' विभाग; ७) इमारत क्रमांक १ व २, ८० टेनामेंटस्, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पूर्व), 'एन'विभाग; ८) चंदनवाडी, बी. आय. टी. चाळ क्रमांक १ ते ६, चंदनवाडी, मरीन लाईन्स, 'सी' विभाग; ९)सीटी सर्व्हे क्रमांक २००२, मेहता इमारत, जेकब सर्कल, सातरस्ता, भायखळा (पश्चिम), 'ई' विभाग (पश्चिम); १०) मांडवी इस्टेट ५३/२५ डी, केशवजी नाईक मार्ग, मुंबई ४०० ००९, 'बी' विभाग; ११)३८०, जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा, जे. एस. एस. मार्ग, ठाकूरद्वार, मुंबई ४०० ००२, 'सी'विभाग; १२) ४४/४६ इस्माईल कर्टे मार्ग, पार्वती मॅन्शन, मुंबई ४०० ००८, 'सी' विभाग; १३) ताडवाडी बी. आय. टी. चाळ क्रमांक १३ ते १६, सेंट मेरी मार्ग, माझगांव, 'ई' विभाग (पूर्व); १४) लांबी सिमेंट चाळ 'ए' व 'बी', नागपाडा, 'ई' विभाग (पश्चिम); १५) शिवाजी नगर इमारत क्रमांक ३, खेरवाडी, वांद्रे(पूर्व), 'एच/पूर्व' विभाग; १६) महाराष्ट्र नगर (१) बीएमसी चाळ क्रमांक १ ते ५ आणि ८, स्लॉटर हाऊस कंपाऊंड, एस. व्ही. मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५०, 'एच/पश्चिम' विभाग; १७) शास्त्रीनगर बीएमसी चाळ क्रमांक ६ व ७, स्लॉटर हाऊस कंपाऊंड, एस. व्ही. मार्ग, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५०, 'एच/पश्चिम' विभाग; १८) सर्क्युलर इमारत, एस. व्ही. मार्ग, वांद्रे (पश्चिम), 'एच/पश्चिम' विभाग;१९) गोमाता नगर ट्रान्झिट कॅम्प इमारत क्रमांक १ ते १०, सीटी सर्व्हे क्रमांक ४३७ (पार्ट) लोअर परेल डिव्हीजन, जी. के. मार्ग, वरळी, 'जी/दक्षिण' विभाग.
‘सी - २ए’ प्रवर्गातील धोकादायक इमारती – ‘ज्यांचा काही भाग निष्कासित करुन दुरुस्ती करणे आवश्यक आहे’ - त्यांची नावे व पत्ता पुढीलप्रमाणेः-
१) ओ. पी. क्रमांक ७०, मांडवी इस्टेट, टी. पी. क्रमांक १, 'बी' विभाग; २) इमारत क्रमांक २ व १४ किडवई नगर, आर. ए. किडवई मार्ग, वडाळा, 'एफ/दक्षिण' विभाग; ३) २७ टेनामेंटस् स्टाफ क्वॉर्टर्स,सखाराम लांजेकर मार्ग, शिवडी नाका, मुंबई ४०००१५, 'एफ/दक्षिण' विभाग; ४) इमारत क्रमांक ५८-ओ, ५८ – एफ २ आणि ५९, जी. डी. आंबेकर मार्ग, परळ, 'एफ/दक्षिण' विभाग; ५) शाहू नगर, ए २ इमारत, धारावी, 'जी/उत्तर' विभाग; ६) जुनी इमारत क्रमांक १ ते ५, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी, 'जी/उत्तर' विभाग; ७) १०० टेनामेंटस्, मॅच फॅक्टरी लेन, एल, एम, एन, पी, आर विंग, कुर्ला, मुंबई - ४०० ०७०, 'एल' विभाग; ८) १८० टेनामेंटस्, मॅच फॅक्टरी लेन, बी, सी, डी, एफ, जी, एच, आय, जे, के विंग,कुर्ला, मुंबई ४०० ०७०, 'एल' विभाग.
No comments:
Post a Comment