मुंबई १३ मे - प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेची मार्केट्स खाजगी विकासकाकडून विकास करण्या ऎवजि सदर मार्केट्स चा पालिकेने स्वत हा विकास करावा अशी मागणी करीत आज शिवसेनेकडून सर्व विरोधकांनी मार्केट विकासाबाबतच्या तिन्ही प्रस्तावांना जोरदार विरोध केला. सदर पुनर्विकासाचे तिन्ही प्रस्ताव परत पाठविण्याची मागणी शिवसेनेने करूनही सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी यातील एक प्रस्ताव राखून ठेवत इतर दोन प्रस्ताव परत पाठविण्याचा निर्णय घेतला.
सुधार समितीमध्ये पालिका मंडईच्या पुनर्विकासाकावर चर्चा करताना शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांनी या विषयाचे तिन्ही प्रस्ताव परत पाठविण्याची सूचना केली. याला पाठींबा देताना कॉंग्रेसच्या मोहसीन हैदर यांनी मार्केटच्या पुनर्विकासाची जबाबदारी खाजगी विकासकांना दिल्यामुळे पालिका मार्केट ऎवजि माल दिसतील असे सांगत या प्रस्तावाला विरोध केला , पेडणेकर यांनी यापूर्वी खाजगी विकासकाने विकसित केलेल्या मार्केट बाबत अनेक तक्रारी असल्याचे स्पष्ट केले .
पालिका कोणत्या कलमाखाली विकासकांना हि मार्केट देत आहे . ३५ टक्के फंजीबल देण्याबाबत काय नियम आहे , सुधारित आराखडे ना हरकतीसाठी पालिकेची मंजुरी हवी कि नको असे सवाल करीत याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली, तसेच यामध्ये किती क्षेत्रफळाचे गाळे दिले जाणार याचीही उल्लेख नाही आणि यावर पालिकेचे बोधंचिन्ह असणार कि नाही हे हि स्पष्ट नसल्याचे पेडणेकर यांनी सांगितले . नयना शेठ यांनी सदर ठिकाणी पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणी केली तर नौशीर मेहता यांनी आतापर्यंत किती मार्केट बांधली , कितीची कामे सुरु झालेली नाही असे सवाल करीत सदर प्रस्ताव परत पाठविण्याची मागणी केली
No comments:
Post a Comment