मुंबई / प्रतिनिधी 24 May 2016
मुंबईच्या सैांदर्यात भर टाकणार्या एैतिहासिक अशा पवई तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे असुन महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व कामचुकार भुमिकेमुळे या तलावाला हळुहळु गटारगंगेचं स्वरूप येताना दिसत आहे. या पार्श्वभूमिवर आज अचानक खासदार किरीट सोमैय्यांनी या तलावाला भेट देवून त्याची पाहणी केली. या भेटीत त्यांनी पवई तलावात सोडल्या जाणार्या आजुबाजुच्या परिसरातील सांडपाणी व मलनिसारन वाह ीन्यांची व त्यामुळे दुर्गंधीयुक्त झालेल्या पवई तलावाची पाहणी करुन त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे समजते.
या भेटीदरम्यान त्यांनी अधिकार्यांना फैलावर घेत त्यांची कानउघडणी केली. येत्या तीन दिवसांत जर यावर काही ' अॅक्शन प्लान ' आला नाही तर महापालिकेच्या त्या सर्व संबंधित अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी उपस्थित अधिकार्यांना दिला. मात्र त्यांनी यावेळी ज्या पंचतारांकीत हॅाटेल्स व कमर्शियल कॅाम्प्लेक्स मधुन ही घाण व मैला सोडला जातो त्यावर बोलणं टाळलं. यावेळी खा. सोमैय्या समवेत महापालिकेचे गटनेते मनोज कोटक व सुधार समिति अध्यक्ष प्रकाश गंगाधरे उपस्थित होते. खा. किरीट सोमैय्यांच्या या धावत्या पाहणीत पुरेसं गांभीर्य नसलं तरीही या अचानक भेटीने पवईकरांच्या आशा मात्र वाढल्या आहेत.
No comments:
Post a Comment