मुंबई / प्रतिनिधी - नालेसफाई मध्ये अडथळा ठरणारी सुमारे १५० अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या एच पश्चिम विभागाने केलेल्या अतिक्रमण विरोधी धडक कारवाई दरम्यान आज हटविण्यात आली आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ परिसरातील साऊथ ऍव्हेन्यू नाला, मेन ऍव्हेन्यू नाला, नॉर्थ ऍव्हेन्यू नाला, पी ऍण्ड टी नाला व एसएनडीटी नाला यासारख्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई करण्याचे काम आता सुकर झाले आहे. या अतिक्रमणामुळे नालेसफाईसाठीची यंत्रसामुग्री व वाहने नाल्यापर्यंत पोहचणे जिकिरीचे झाले होते. आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे सदर पाच नाल्यांच्या सफाईला वेग येणार आहे.
आज करण्यात आलेल्या या कारवाईत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी तसेच सांताक्रूझ पोलिस स्टेशन यांचे महापालिकेला विशेष सहकार्य लाभले. महापालिकेच्या एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या ६० जणांच्या चमूने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये सहाय्यक अभियंता एम. झेड. सय्यद व सचिन शिंदे यांचाही समावेश होता. गेल्या आठवड्यात देखील एच पश्चिम विभागाद्वारे वांद्रे पश्चिम परिसरातील बेस्ट डेपोजवळील बोरन नाल्यातील अनधिकृत असलेली २१ बांधकामे तोडण्यात आली होती. ज्यामुळे सदर नाल्याच्या साफसफाईला आता गती आलेली आहे.
No comments:
Post a Comment