मुंबई : प्रतिनिधी - यंदाच्या वर्षात राज्यातील विविध नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. स्थानिक पातळीवर त्या दृष्टिने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत यंदा नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार आहे, याबाबतचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यंदा पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवडीची रंगत चांगलीच रंगणार आहे.
या निर्णयाबरोबरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रभाग रचनेवरही शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यापुढे २ वॉर्डचा १ प्रभाग करण्यात येणार आहेत. राज्यात पाच वर्षे पूर्ण झालेल्या २१५ नगरपालिकांची निवडणुक यंदा पार पडणार आहे. या निवडणुकीचे रंग स्थानिक पातळीवर आतापासूनच दिसू लागले आहेत. सर्व पक्षांनी त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नगराध्यक्षाची निवड आता थेट जनतेतून होणार असल्याने या पदासाठीची निवडणुक खऱ्या अर्थाने चुरशीची होणार आहे. तसेच अनेक पक्षांना पक्षांर्गत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची मनधरनी करण्याची कसरत करावी लागणार आहे. तसेच २ वॉर्डचा १ प्रभाग होणार आहे. यामुळे प्रशासनाला आता त्या दृष्टिने तयारीला सुरूवात करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment