मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे - एव्हरेस्टवीर शेख यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2016

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे - एव्हरेस्टवीर शेख यांच्यावर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार

मुंबईदि. 23 : माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केल्यानंतर हिमदंशामुळे जखमी झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील शेख रफिक शेख ताहेर पटेल यांच्यावर दिल्लीतील आर्मी रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कार्यवाही केली आहे. या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शेख यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासाही दिला.


औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस नाईक शेख यांनी नुकतेच एव्हरेस्ट शिखर यशस्वीरित्या सर केले. मात्रया यशस्वी मोहिमेदरम्यान त्यांच्या पायाला हिमदंश झाला. शेख यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून काठमांडू येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु त्यांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने त्यांच्यावर विशेष तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक होते. हे उपचार दिल्ली येथील आर्मी रेफरल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याने त्यांना तेथे हलविणे गरजेचे होते. याबाबत माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी संपर्क साधला. शेख यांच्यावर विशेष बाब म्हणून आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रगत उपचार करण्याची विनंती त्यांनी पर्रिकर यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देताना पर्रिकर यांनी शेख यांच्यावर आर्मी रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याबाबतचे तात्काळ आदेश दिले. त्यामुळे शेख यांना तातडीने काठमांडू येथून दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर निष्णात डॉक्टरांकडून उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणाही होत आहे.


            
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेख यांच्याशी स्वत: संपर्क साधून त्यांचे या मोहिमेतील यशाबद्दल अभिनंदन करतानाच प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांना दिलासा देतानाच महाराष्ट्र सरकार उपचारासाठी सर्वतोपरी सहाय्य करेलअशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शेख यांना आश्वस्त केले. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसह संरक्षणमंत्र्यांचे या कार्यवाहीबाबत आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad