दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिज्ञा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2016

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिज्ञा

मुंबई, दि. 20 : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.

मंत्रालय, मुख्य इमारतीच्या परिसरात फडणवीस यांनी प्रारंभी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी- कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतलेली प्रतिज्ञा :
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad