एन्टोपहिल येथील कब्रस्तानच्या जागे संदर्भात शिवसेना सभागृह नेत्याच्या घरावर मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2016

एन्टोपहिल येथील कब्रस्तानच्या जागे संदर्भात शिवसेना सभागृह नेत्याच्या घरावर मोर्चा

मुंबई / प्रतिनिधी 25 May 2016
वडाला एन्टोपहिल येथे सुन्नी मुस्लिम वडाळा कब्रस्तान ट्रस्टचे कब्रस्तान आहे. या कब्रस्तानला लागुन असलेला भूखंड पालिका नियमाप्रमाणे कब्रस्तानसाठी देणे गरजेचे असताना चुकीच्या माहितीच्या आधारे हा भूखंड लाटला जात असल्याने शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका आणि सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या घरावर 27 मे रोजी मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिली आहे.


वडाला एन्टोपहिल येथे सुन्नी मुस्लिम वडाळा कब्रस्तान ट्रस्टचे 80 हजार चौरस फुट जागेवर कब्रस्तान आहे. या कब्रस्तानला लागून 3 हजार चौरस फुटाचा भूखंड आहे. हा भूखंड कब्रस्तानला द्यावा अशी मागणी कित्तेक वेळा करण्यात आली परंतू पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. मोकळ्या भुखंडाच्या बाजूला कब्रस्तान आहे हे लपवून या जागेवर लहानमुलांसाठी टॉय लायब्ररी बनविली जाणार आहे. विकास आराखडा मंजूर झाला नसताना आणि विकास आराखडयाला शिवसेनेचा विरोध असताना शिवसेनेच्या सभागृह नेत्या विश्वासराव यांनी  टॉय लायब्ररी बांधण्यास सुरुवात केली आहे.

सध्या ज्या जागी कब्रस्तान 100 वर्षे जुना आहे. त्या ठिकाणी इतर धार्मिक विधि करताना अडचणी येत असतात. मृत व्यक्तीबरोबर येणार्या लोकाना रस्त्यावर रहदारी रोखून नमाज करावा लागतो. दफ़न विधी केल्यावर स्त्री आणि पुरुषांना लोकाना अंगावर पाणी घ्यावे लागते अशी सोय या ठिकाणी नाही. पालिका नियमाप्रमाणे 50 हजार चौरस फूटा वरील दफ़नभूमी मधे लोकांना पर्यायी रस्ते असावे लागतात परंतू या ठिकाणी एकच रस्ता असल्याने कधीही दुर्घटना घडू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

कब्रस्तान बाजुचा 3 हजार चौरस फुटाचा भूखंड मिळाल्यास या सोयी सुविधा करता येतील. रस्त्यावरील नमाज पडण्यासाठी रहदारीही रोखावी लागणार नसल्याने हा भूखंड ट्रस्टला देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांची ट्रस्टच्या पदाधीकाऱ्यानी भेट घेतली असता आदित्य यांनी तृष्णा विश्वासराव याना फोन करून प्रकरण मिटवा असे निर्देश दिले होते. परंतू त्या नंतर विश्वासराव यांनी टॉय लायब्ररीची खालची जागा तुम्ही घ्या आणि वरील जागा टॉय लायब्ररीला दया असा प्रस्ताव दिला आहे. खालच्या मजल्यावर मृत लोकांचे अंतिम विधि वेळेचे धार्मिक कार्यक्रम केल्यास लहान मुलांवर याचा परिणाम होणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad