भ्रष्टाचाराची चौकशी न्यायाधीशांकडून करा
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेमधे सातत्याने घोटाले बाहेर येत आहेत. घोटाले बाहेर येत असताना सत्ताधारी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंग आहेत. पालिकेवर सत्ताधारी पक्षाचा अंकुश राहिला नसल्याने आणि घोटाल्याची योग्य प्रकारे चौकशी केली जात नसल्याने मुंबई महानगरपालिका बरखास्त करावी आणि पालिकेतील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या सिटिंग किंवा निवृत्त न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी कोंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी निरुपम यांच्या सोबत चरणसिंग सप्रा, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, संदेश कोंडविलकर उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेत नालेसफाई, रस्त्याचा, ट्याबचा घोटाला बाहेर आलेला आहे. पालिका कचरा व्यवस्थापनात पूर्ण अपयशी ठरली आहे. सत्तेत सहभागी असलेली भाजपा घोटाले बाहेर काढण्यात खुपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. भाजपा सत्तेत बसून घोटाले बाहेर काढत असले तरी हेच सत्ताधारी काल्या यादीतील कंत्राटदाराना पुन्हा नव्याने कंत्राटे देत असल्याने दोषीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे निरुपम यांनी सांगितले.
महापालिकेत सत्ताधारीच एकमेकांविरोधात काम करत असल्याने रोज नविन घोटाले बाहेर येवू लागले आहेत. यामुले भ्रष्टाचाराविरोधात कड़क भूमिका घेण्याचे भासवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या 520 डी कलमान्वये मुंबई महानगरपालिका बरखास्त करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केल्याचे निरुपम यांनी सांगितले. पालिका आयुक्तही भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरले आहेत. मुंबईच्या सन 2014 ते 2034 च्या डीपीमधे चार हजार हेक्टर जमिन ओपन करून त्यावर बांधकामाची परवानगी दिली जाणार आहे. मुलुंड ते घाटकोपर येथील खार जमिन आणि पोर्ट ट्रस्टची जमिन विकली जाणार असल्याने आयुक्तांवरचा विश्वास उडाला असल्याचे सांगत बाहेरून प्रशासक नेमावा अशी मागणी निरुपम यांनी केली.
बांद्रयाचा साहेब खरा कोण ?
भाजपाच्या खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेत माफिया राज सुरु असल्याचे सांगत बांद्रयाचा साहेब त्यांचा मेव्हणा आणि सचिव याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. बांद्रयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे दोघेही राहतात. सोमय्या यांनी साहेबाचे नाव जाहिर केलेले नाही. यामुले या दोघापैकी नेमका साहेब कोण त्यांचे नाव सोमय्या यांनी जाहिर करावे असे आवाहन संजय निरुपम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment