मुंबई / प्रतिनिधी - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अशी घोषणा केली कि मुंबईतील नाले सफाईची पाहणी करणार नाही तसेच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे कि मुंबईतील नाले सफाईची जबाबदारी हि प्रशासनाची आहे. यावर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले कि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना आश्वासन दिले होते कि मुंबईत या वर्षी पाणी साचणार नाही व नाले सफाई योग्य रीतीने होईल. परंतु त्यांनी आता अशी घोषणा केली कि नाले सफाईची पाहणी करणार नाही. शिवसेना आपली जबाबदारी झटकत आहे.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईकरांनी निवडणुकीत शिवसेनेला मते दिली, त्यांना जिंकून दिले. तेव्हा मुंबईकरांना चांगले रस्ते, शुद्ध पाणी, नाले सफाई आणि मुंबईतील स्वच्छता हि सर्व कामे करणे, हि शिवसेनेची जबाबदारी आहे. परंतु शिवसेना हि सर्व कामे करण्यात अपयशी ठरलेली आहे. नाले सफाईत १५० कोटींचा घोटाळा झालेला आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे नाले सफाईची पाहणी करत नाहीत. शिवसेना या जबाबदारीतून पळ काढत आहे. शिवसेनेने मुंबईकरांचा विश्वासघात केलेला आहे.

ते पुढे म्हणाले कि मागच्या वर्षी नाले सफाईची पाहणी करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते कि मुंबईतील नाले सफाई व्यवस्थित झाली आहे. तेव्हा या वर्षी मुंबईत पाणी साचणार नाही परंतु मागच्या वर्षी देखील मुंबईत पाणी भरले होते. या वर्षी हि तीच परिस्थिती आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना अजून हि मुंबईत नाले सफाई झालेली नाही. नाल्यातील गाळ बाहेर काढला नाही म्हणून या वर्षी देखील मुंबईत पाणी भरेल आणि मुंबईकरांना होणार्या त्रासाला शिवसेनाच जबाबदार असेल. यामुळे शिवसेना पळ काढत आहे.
संजय निरुपम म्हणाले कि भाजपा देखील यावर काहीच बोलत नाही आहे. ते सत्तेत असून हि विरोधात असल्यासारखे वागत आहे. भाजप शिवसेनेवर फक्त आरोप करते आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन दशकापासून शिवसेना आणि भाजपाची सत्ता असून ते दोघे हि मुंबईकरांना सुविधा देण्यात असफल ठरलेले आहेत. शिवसेना आणि भाजपा मध्ये फक्त आरोप प्रत्यारोपच चालला आहे. दोघे हि आपापल्या जबाबदारीतून हात झटकत आहेत. शिवसेना आणि भाजपाला मुंबईकरांची कामे करायची नसतील त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ता सोडून द्यावी. दोघे हि मुंबईकरांची कामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. तेव्हा त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताच अधिकार नाही.
No comments:
Post a Comment