महापालिका आयुक्त व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचा संयुक्त नालेसफाई पाहणी दौरा संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2016

महापालिका आयुक्त व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचा संयुक्त नालेसफाई पाहणी दौरा संपन्न

मुंबई / प्रतिनिधी 25 May 2016
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे रेल्वे स्थानक यादरम्यान रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास करुन मध्य रेल्वेच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. 


सदर पाहणीदरम्यान महापालिका आयुक्तांनी मस्जिद बंदर येथील वालपाखाडी नाला, सँडहर्स्ट रोड ते भायखळा दरम्यानचे नाले तसेच, शीव स्टेशन जवळील मुख्याध्यापक नाला, कुर्ला स्टेशन जवळील कारशेड नाला, कांजुरमार्ग येथील कर्वेनगर नाला, मुलुंड येथील नाणेपाडी नाला इत्यादी नाल्यांची पाहणी केली.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यांनी रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईबाबतची कार्यवाही योग्यप्रकारे सुरु असल्याचे दिसून आल्याचे सांगीतले. या दौ-यादरम्यान महापालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ५) भारत मराठे, उप आयुक्त (परिमंडळ २) आनंद वागराळकर, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी व मध्य रेल्वेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad