विशेषाधिकारातील परवानग्यांची संख्या ३५ वरुन १४ वर प्रस्तावित
मुंबई / प्रतिनिधी - इमारतीतील वाहनतळाच्या उंचीबाबत काही विशीष्ट बदल करणे किंवा इमारतीच्या परिसरात विद्युत उपकेंद्रासाठी परवानगी, अंतर्गत जिन्यासंबंधी परवानगी किंवा सोसायटी ऑफीस संबंधी परवानगी यांसारख्या विविध ३५ परवानग्या केवळ महापालिका आयुक्तांच्या विशेषाधिकारात दिल्या जात असत. मात्र आता 'सुधारित प्रारुप विकास आराखडा २०३४' यामध्ये ३५ पैकी २१ परवानग्या महापालिका आयुक्त स्तरावरुन कमी करण्याचे महापालिका आयुक्तांनी स्वतःच प्रस्तावित केले आहे.
आता महापालिका आयुक्त स्तरावर लागणा-या परवानग्यांची संख्या ३५ वरुन १४ इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. या १४ परवानग्यांपैकी ४ परवानग्या या 'एमआरटीपी' कायद्यांतर्गत असल्याने त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महापालिका आयुक्तांच्या विशेषाधिकारात देण्यात येणा-या ३५ परवानग्यांपैकी महापालिका आयुक्त स्तरावरील ज्या २१ परवानग्या कमी करण्याचे 'सुधारित प्रारुप विकास आराखडा २०३४' अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
२१ परवानग्या कमी
१. स्टॅक पार्किग / पझल पार्किंग / यांत्रिकी पार्किग यांना सामावून घेण्यासाठी स्टील्टची उंची ४.२ मीटर
देण्यासाठीची परवानगी
२. विकास नियंत्रण नियमावलीत विहीत केल्यानुसार खोल्यांचा आकार पुरेसा नसण्याबाबत परवानगी (उदाहरणार्थ:
छोट्या आकाराच्या खोल्या ज्यामध्ये देवघर, अडगळीची खोली इत्यादींबाबतची परवानगी)
३. इमारतीच्या स्टील्टमध्ये / पोडियम मध्ये विद्युत उपकेंद्र देण्याबाबत परवानगी
४. नियोजनातील निर्बंधामुळे पोकळी (Void) निर्माण होत असल्यास ती चटई क्षेत्र निर्देशांक मुक्त करण्याबाबत
५. प्रस्तावित पार्किग जागा या आवश्यक असणा-या पार्किग जागांपेक्षा कमी असल्यास त्याबाबत सूट देणे
६. नियमित आकाराची खोली देण्याऐवजी बहुउद्देशीय खोली देण्याबाबतची परवानगी
७. कृत्रीम वायूविजन शाफ्टचा आकार पुरेसा नसल्यास त्याबाबत सूट देऊन परवानगी देणे
८. आवश्यक असणा-या पार्किग जागांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त लहान पार्किग जागा देण्याबाबतची परवानगी
९. अधिमूल्य आकारुन दुकाने / उपहारगृहे / डुप्लेक्स सदनिका याकरिता आतील जिन्याबाबत चटई क्षेत्र निर्देशांकात
परिगणन न करता परवानगी देणे
१०. आवश्यकतेपेक्षा जास्त सदनिका घनता (Tenement Density)देण्याबाबतची परवानगी
११. मार्गिकेच्या पुरेशा नसलेल्या रुंदीबाबत सूट देण्याची परवानगी
१२. मजल्यांची कमी उंची करण्याबाबतची परवानगी
१३. पार्किगसाठी प्रस्तावित असलेल्या तळघरात प्रवासी उद्वाहन जाऊ शकेल याबाबतची परवानगी
१४. गृहनिर्माण संस्थेचे कार्यालय वरील मजल्यावर देण्याची परवानगी
१५. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक असणा-या पार्किग जागांपेक्षा २५ टक्के अतिरिक्त पार्किग जागा
देण्याची परवानगी
१६. पीछेहाटीचे क्षेत्र / विकास नियोजन रस्ता यांच्या चटई क्षेत्र निर्देशांकांचा फायदा अगोदरच घेतलेला आहे तो चटई
क्षेत्र निर्देशांक संरक्षित करणे याबाबतची परवानगी
१७. १५०० चौ.मी. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या भूखंडावर पोडियमची परवानगी देणे
१८. इमारतीमध्ये शॉपींग / डिपार्टमेंटल स्टोअर / नर्सिग होम बाबत परवानगी देणे
१९. भूखंडास लगतच्या किमान ६ मीटर रुंदीच्या दोन रस्त्यांनी प्रवेश मार्ग असल्यास इमारतीचा विकास ७० मी.
पर्यत उंच करण्याकरिता परवानगी देणे
२०. भूखंडास लगतच्या किमान ६ मीटर रुंदीच्या रस्त्याने प्रवेश मार्ग असल्यास इमारतीचा विकास ३२ मी. पर्यत
उंच करण्याकरिता परवानगी देणे
२१. भूखंडावर आवश्यक करण्यात आलेल्या मोकळ्या जागेतील ३२ मीटर उंचीच्या यांत्रिकी पार्किग टॉवरसाठी ३.६ मीटर इतकी आणि ३२ मीटर पेक्षा उंची जास्त असल्यास ६ मीटर इतकी इमारतीच्या भोवतालची मोकळी जागा गृहीत धरुन लागणा-या इमारतीच्या भोवतालच्या मोकळ्या जागेमधील कमतरता अधिमूल्य भरुन परवानगी देण्याबाबत
१४ परवानग्या या पूर्वीप्रमाणेच कायम
१. इमारतींच्या लगतच्या मोकळ्या जागेतील कमतरतांबाबत सूट देणे
२. अनुमत फंजीबल चटई क्षेत्र निर्देशांकास परवानगी देणे
३. जीना, जीन्याची लॉबी, उद्वाहन, उद्वाहनाची लॉबी यांच्या क्षेत्राबाबत चटई क्षेत्र निर्देशांक परिगणन न
करण्याकरिता परवानगी
४. भूखंडावर आवश्यक करण्यात आलेल्या मनोरंजन मैदानाचा आकार वेडावाकडा असल्यास तो वाहनांच्या
आवागमनासाठी फरसबंद करण्याची परवानगी
५ वाहनांच्या दुहेरी आवागमनाकरिता असलेल्या जागेतील काही भाग पुरेसा रुंद नसल्यास त्याबाबत सूट देण्याची
परवानगी
६. विलगीकरण अंतराबाबत सूट देण्याची परवानगी
७. मुंबई वारसाजतन समितीचे ना-हरकत प्रमाणपत्र २४ मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या इमारती वारसा
विभागात (Heritage precinct) असल्यास बंधनकारक करु नये याविषयी परवानगी
८. संबंधित पट्टयात अनुज्ञेय असलेल्या उपक्रमात बदल करण्याबाबत परवानगी
९. जीन्याची रुंदी पुरेशी नसल्याबाबत सूट देण्याची परवानगी
१०. दोन मोटर उद्वाहन (Car lift) ऐवजी एकच मोटर उद्वाहन देण्याची परवानगी
११. मोठ्या आकाराच्या कॅनॉपीला परवानगी देण्याबाबत
१२. इमारतीच्या दर्शनी मोकळ्या जागेमध्ये प्रस्तावित लोखंडी पाय-यांबाबत(MS steps) परवानगी
१३. आवश्यक असलेल्या दुस-या जीन्याबाबत सूट देण्याबाबतची परवानगी
१४. विकास नियंत्रण नियमावलीतील नियम क्रमांक ३३ (२) अन्वये तांत्रिक व वैद्यकीय संस्था आणि संस्था इमारती (Institutional Buildings) / शासकीय इमारती आणि निमशासकीय कार्यालयाच्या इमारती सार्वजनिक
उपक्रमाच्या इमारती आणि तांत्रिक संस्था / विभागीय इमारती यांना देण्यात येणा-या अतिरिक्त चटई क्षेत्र
निर्देशांकांबाबत परवानगी
No comments:
Post a Comment