डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये उभारणार साडे तीनशे फूट उंचीचा पुतळा - राजकुमार बडोले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2016

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये उभारणार साडे तीनशे फूट उंचीचा पुतळा - राजकुमार बडोले

- आराखड्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
- विपश्यना सभागृह, ग्रंथालय, थिम पार्कचा समावेश
- डिजिटल तंत्राच्या सहाय्याने ऐकता येणार डॉ. आंबेडकर यांची भाषणे
मुंबई, दि. 11 : इंदू मिल येथील जागेवर उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या आराखड्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा सुमारे साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.


इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बृहत आराखड्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श बडोले बोलत होते. यावेळी स्मारकाचे वास्तुरचनाकार शशी प्रभू, रिपब्लिकन पार्टीचे नेते डॉ. राजेंद्र गवई, आनंद खरात, मुंबई नगररचना विभागाचे उपसंचालक संजय बाणाईत, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे सहायक अभियंते एन. एन. भोईर, प्रदीप यादव, संपत कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

इंदू मिल येथील स्मारकामध्ये डॉ. आंबेडकर यांचे स्टॅच्यू ऑफ इक्विटी उभारण्यात येणार आहे. याशिवाय संसदेची प्रतिकृती, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय,चार हजार आसनक्षमतेचे विपश्यना सभागृह, आर्ट गॅलरी आणि 1500 लोकांसाठीचे सभागृह उभारण्याचे नियोजन आहे. तसेच आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर करून डॉ. आंबेडकर यांचे जीवन चरित्र मांडण्यात येणार असून त्यामध्ये डॉ. आंबेडकर यांचे भाषण ऐकता येणार असून डिजिटल चलचित्रांचाही समावेश करण्यात यावा. स्मारकाच्या परिसरात थीम पार्क उभारण्याचा मानस असल्याचे बडोले यांनी यावेळी सांगितले. स्मारकाच्या आराखड्याचे काम जलदगतीने करून प्रत्यक्ष कामास तातडीने सुरुवात करावी,  असे निर्देशही बडोले यांनी यावेळी दिले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad