मुंबईतील नाल्यांवर क्लीनअप मार्शलची नजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2016

मुंबईतील नाल्यांवर क्लीनअप मार्शलची नजर

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील नालेसफाईवर आरोप प्रत्यारोप होत असतात. महापालिका नालेसफाई करत असली तरी नाल्याच्या बाजुला राहणारे लोक नाल्यात पुन्हा कचरा टाकत असल्याने 1 जून पासून सुरु होणाऱ्या क्लीनअप मार्शलना नाल्यावर नियुक्त केले जाणार आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्या लोकांवर क्लीनअप मार्शल द्वारे कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त संजय देशमुख यांनी दिला आहे. मुंबईमधे 50 ते 60 लाख लोक झोपडपट्टीमधे राहतात. नाल्याबाजुला राहनार्या लोकांकडून नाल्यात कचरा टाकला जातो यामुले नाल्यात कचरा साचून पाणी साचते. लोकाना आवाहन करूनही लोक नाल्यात कचरा टाकत असल्याने क्लीनअप मार्शलची मदत घ्यावी लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.


मुंबईमधे 565 किलोमिटर लांबीचे नाले आहेत. यापैकी मीठी नदीची 76, मोठ्या नाल्यांची 66 टक्के तर लहान नाल्यांची 35 टक्के सफाई करण्यात आली आहे. मागील वर्षी नालेसफाईमधे भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्याने आता टेंडर पॉलिसीमधे बदल करण्यात आले आहेत. जेवढा गाळ काढला तेव्हडेच पैसे कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. वजन काटे ठरवले असून याच काट्यावर वजन करावे लागणार आहे. या वजन काट्यावर पालिकेचे 4 कर्मचारी 2 पाळ्यामधे नजर ठेवली जाणार आहे. गाळ टाकण्यासाठी 9 ठिकाणे निश्चित केली असून याच ठिकाणी गाळ टाकावा लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

गाळ टाकाला जातो की नाही याची शहानिशा करण्यासाठी वजन काट्यापर्यन्त घन कचरा व्यवस्थापन विभाग तर कचरा डंपिंगवर टाकला जातो की नाही याची शहानिशा विजिलेंस विभाग करणार आहे. नालेसफाई करताना कंत्राटदार विहायकल ट्रयाकिंग सिस्टमचा वापर करून पालिकेला डेटा दिला जात होता. आता विहायकल ट्रयाकिंग सिस्टमवर पालिकेचा कंट्रोल असणार आहे. चलनमधे याआधी अनेक फेर्यांची नोंदी असायच्या आता एक चलन एकाच फेरीसाठी वापरले जाणार आहे. नाले सफाईची गाळ वाहून नेणारा डंपर आता एकाच गटासाठीच वापरता येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad