पाण्यासाठी शहापूरवासियांचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2016

पाण्यासाठी शहापूरवासियांचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा

मुंबई, दि. 17 - प्रतिनिधी - राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना शेजारी धरण असूनदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागणा-या शहापुरवासियांनी शहापूर ते मंत्रालय जलदिंडी पदयात्रा काढली. शहापूरवासियांनी जलदिंडी पदयात्रा काढत मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा नेला. शहापूरमधील धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा होतो मात्र तिथेच राहणा-यांच्या घशाला कोरड पडलेली आहे. पाण्यासाठी त्यांना मैलोनमैल फिराव लागतं आहे. राणीबागहून दुपारी 12 वाजता निघालेली पदयात्रा 2 वाजता आझाद मैदानात पोहोचली. मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. जे जे उड्डाणपुलावरून मोर्चा नेण्यात आला होता त्यामुळे भायखळ्याहून सीएसटीकडे येणारी वाहतूक मंदावली होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad