मुंबई, दि. 19 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम योजनेअंतर्गत जून 2016 या महिन्यासाठी 673 मेट्रिक टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.
सदर नियतनाच्या अनुषंगाने जून 2016 करिता एकूण अन्नधान्यापैकी 346 मे.टन तांदूळ व 327 मे.टन गहू एवढे नियतन असून, प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 18 किलो तांदूळ व 17 किलो गहू असे नियतन आहे. दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी एप्रिल महिन्यासाठी प्रतिव्यक्ती 500 ग्रॅम साखर 13.50 रुपये किलो दराने देण्यात येणार आहे. त्यासाठी 86700 किलो साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाचे प्रभारी नियंत्रक यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment