दि म्युनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँकची यशस्वी घोडदौड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2016

दि म्युनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँकची यशस्वी घोडदौड

मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र अर्बन को- ऑप. बँक्स् फेडरेशन लि. मुंबई तर्फे पगारदार नोकरांच्या गटातील सर्वोत्कृष्ट बँक प्रथम पुरस्कार २०१४- १५ कोल्हापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सहकारमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दि म्युनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँकेला प्राप्त झाला असून बँकेच्या वतीने संचालकांनी हा पुरस्कार नुकताच स्विकारला. 

त्याचप्रमाणे महाराष्ट्र एम्प्लॉईज बँकस को- ऑप. असोसिएशन लि. मुंबई यांचेतर्फे ३०० कोटींपेक्षा अधिक ठेवी असणाऱया बँकासाठी २०१४-१५ चे प्रथम पारितोषिक महाबळेश्वर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात दि म्युनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँकेला प्राप्त झाला असून बँकेच्या संचालकांनी हाही पुरस्कार नुकताच स्विकारला आहे.

दि म्युनिसिपल को- ऑपरेटिव्ह बँकेला गत सहा वर्षात सातत्याने विविध प्रकारची पारितोषिक प्राप्त झाली असून खाजगी बँकेसारखी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित बँकीग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. बँकेने ग्रॉस एन्.पी.ए. २०१६ मध्ये १.८४ टक्क्यांवरुन १.५४ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे तर निव्वळ एन.पी.ए ‘०’ टक्के आहे. उत्कृष्ट नियोजन, कर्ज वसूलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन्.पी.ए.चे प्रमाण कमी झाल्याचे महाव्यवस्थापक (प्र.) विनोद रावदका यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad