मेट्रो प्रकल्पात एम एम आर डी ए ला विशेष अधिकार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2016

मेट्रो प्रकल्पात एम एम आर डी ए ला विशेष अधिकार

मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमधील मोनो मेट्रो सह परिवहन सेवेतील बदलाकरिता पालिकेची परवानगीची भविष्यात गरज राहणार नसून याकरिता केवळ राज्य शासनाच्या परवानगीने एम एम आर डी ए  बदल करू शकेल अशी तरतूद नव्या प्रारूप विकास नियोजन आराखड्यात करण्यात आल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पर्यायाने नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येणार असल्याचे सांगत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी या नियमाला विरोध केला . त्यांच्या  या हरकतीच्या मुद्द्यास भा  ज प वगळता ईतर सर्वच पक्षांनी पाठींबा दर्शविल्याने सदर हरकतीच्या मुद्य्यात तथ्य असण्याच्या निर्णय स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिला . 


वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर ताण वाढत असून मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठीच्या मोकळ्या  जागा ही कमी होत आहेत, यातच मेट्रो ची भर पडल्याने अनेक आरक्षित भू भागांचा ऱ्हास होणार आहे, तसेच मेट्रो चा प्रस्तावित मार्ग भुयारी असल्याने मुंबईतील जुन्या व पुरातन इमारतींना धोका पोहचण्याची शक्यता नाकरता येत नाही , यामुळेच पालिका हद्दीतील कायम तत्वावर जागा देण्याबाबतचा प्रस्ताव दफ्तरी दाखल  करण्यात आल्याचे विश्वासराव यांनी स्पष्ट केले. 

मोनो मेट्रो सह कोणत्याही परिवहन सेवेला त्यांच्या प्रस्तावित मार्गातील किंचितही बदलासाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे,परंतु प्रारूप विकास आराखड्यात अशा परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे पालिकेच्या अधिकारावरच गदा येणार असल्याचे विश्वासराव यांनी म्हटले आहे, मुंबईतील मोनो मेट्रो सह कोणत्याही परिवहन सेवेच्या परवानगीसाठी  नगरसवकांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे देणे बंधनकारक असते हे टाळण्यासाठीच आयुक्तांनी याचे अधिकार पालिकेकडून एम एम आर डी  ए कडे दिले असल्याचा आरोप विश्वासराव यांनी केला.  

सभागृह नेत्यांच्या हरकतीच्या मुद्द्याला विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी पाठींबा व्यक्त करताना यामध्ये  ' आपोआपच'  या वादग्रस्त शब्दावर आक्षेप असल्याचे सांगितले, याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे अशी मागणी केली , तर भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी या प्रारूप विकास नियोजन आराखड्यावर ६० दिवसात हरकती घेता येणार असल्याचे सांगत सदर मुद्द्यावर सभागृहात विस्तृत  चर्चा करता येईल असे स्पष्ट केले, अशा प्रकारे सदर मुद्द्यावर आताच चर्चा घडवून त्याचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे, असे सांगत या हरकतीच्या मुद्द्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad