मुंबईतील बेघर नागरिकांना माहितीचा अधिकार प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2016

मुंबईतील बेघर नागरिकांना माहितीचा अधिकार प्रशिक्षण

मुंबई / प्रतिनिधी 24 May 2016 
' माहितीचा अधिकार ' म्हणजे आरटीआय कायदास तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या उद्देश्याने मुंबईतील सेंट जेवियर्स कॉलेजात 100 बेघर नागरिकांना ' माहितीचा अधिकार कायदा 2005' चे प्रशिक्षण दिले गेले. प्रख्यात आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी 1 तासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात बेघर नागरिकांना त्यांस असलेल्या अधिकार प्राप्त करण्यासाठी कश्याप्रकारे आरटीआय सहायक सिद्ध होईल त्याबाबतीत मार्गदर्शन केले.


'पहचान' संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य यांच्यास पुधाकाराने आयोजित 100 बेघर नागरिकांच्या समूहास सेंट जेवियर्स कॉलेज परिसरात आमंत्रित केले गेले होते. अनिल गलगली यांनी यावेळी सांगितले की 'माहितीचा अधिकार कायदा 2005' संपूर्ण देशात लागू झाला आहे. या कायदाच्या माध्यमातून कोण्याही भारतीय नागरिकास कोणत्या सरकारी अधिकारी, सरकारी विभाग आणि सरकारला सुद्धा प्रश्न आणि माहिती विचारण्याची मुभा आहे. ज्यास उत्तर दयावे लागते आणि उत्तर मिळाले नाही तर अपील करण्याची सोय आहे. 'माहितीचा अधिकार 2005' अंतर्गत अर्ज कसा करावा आणि माहितीचा अधिकाराच्या माध्यमातून विविध विषयांवर माहिती मिळवित आपल्या हक्क आणि अधिकार प्राप्त करु शकता असे गलगली यांनी सांगितले.

पहचान संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य यांनी सांगितले की 5 मे 2010 रोजी सुप्रीम कोर्टाने सर्वच राज्य सरकारला आदेश दिले होते की प्रत्येक 5 लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात एका लाखाच्या लोकसंख्येवर एक शेल्टर होम असले पाहिजे. मुंबईत एक सुद्धा शेल्टर होम नसून मुंबई मनपा 7 शेल्टरहोम मुलांसाठी असल्याचा दावा करत आहे. लाखों रुपयांचा निधी कागदावर खर्च होत आहे. सेंट जेवियर्स कॉलेजचे प्रिंसिपल डॉ.अग्नेलो मेनेज़ेस ( ऐगी सर ) यांनी सर्व बेघर नागरिकांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad