मुंबई । प्रतिनिधी - बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव यांनी शहर विभागातील माझगांव येथे बाप्टिस्टा उद्यानामध्ये ‘सात आश्चर्ये’ प्रतिकृती उभारण्याबाबत आज (दिनांक १० मे, २०१६) पाहणी केली. तर परळ गावातील कुबेर गल्ली येथील मासळी बाजार व प्रताप घोगळे उद्यानाला काल (दिनांक ०९ मे, २०१६) भेट देऊन प्रशासनाला या दोन्ही ठिकाणी योग्य ती दुरुस्ती व स्वच्छता राखण्याबाबत निर्देश दिले.
महापालिकेच्या ‘ई’ विभागातील बाप्टिस्टा उद्यानामध्ये ‘जागतिक सात आश्चर्ये’ प्रतिकृती उभारण्याबाबत पाहणी करण्यात आली. पुणे महानगरपालिकेने दोन एकर क्षेत्रावर याप्रकारचे उद्यान उभारले असून त्या धर्तीवर पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून हे उद्यान उभारण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तथापि, बाप्टिस्टा उद्यान हे जलकुंभावर बनवलेले आहे. त्याची सुरक्षा पाहता वजनाने हलके, फायबरपासून निर्मित ‘सात आश्चर्ये’ प्रतिकृती बनवून या उद्यानाच्या हिरवळीवर उभारण्याविषयी चाचपणी करावी, असे यावेळी ठरविण्यात आले.
यामिनी जाधव यांनी कुबेर गल्ली येथील मासळी बाजारात भेट दिली असता, तेथे स्वच्छता व आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचे तसेच प्रताप घोगळे उद्यानात सुशोभिकरण करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले. त्याचबरोबर काळबादेवी भागातील मुंबादेवी उद्यानालाही भेट दिली. सदर उद्यानही अधिक आकर्षक दिसण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले.यावेळी एफ/दक्षिण व एफ/उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षा हेमांगी चेंबूरकर, सहाय्यक आयुक्त (बाजार) संजय कुऱहाडे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment