मुंबई, दि. 30 : जे राज्य, देश छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालेल तो देश किंवा राज्य पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि तो जगातील सर्वश्रेष्ठ देश अथवा राज्य होईल. डॉ. बाबासासाहेब आंबेडकर यांचे संविधान व महात्मा फुले यांच्या विचारावरच राज्याचा कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालेल तो देश किंवा राज्य पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि तो जगातील सर्वश्रेष्ठ देश अथवा राज्य होईल. डॉ. बाबासासाहेब आंबेडकर यांचे संविधान व महात्मा फुले यांच्या विचारावरच राज्याचा कारभार सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
अनुसुचित जाती, जमाती/विजा-भज/इ.मा.व./वि.मा.प् र. शासकीय/निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, मंत्रालय यांच्या वतीने मंत्रालयात आज छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, खासदार डॉ. नरेंद्र जाधव, जय महाराष्ट्र वाहिनीचे कार्यकारी संपादक विलास आठवले, मीरा भाईंदर पालिकेच्या सभापती वंदना चक्रे, उद्योजिका कल्पना सरोज, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजातील वंचितांचा आवाज बुलंद करण्याचे, त्या आवाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांनी केले. सामान्य माणसाला जागृत करून असामान्य काम करून घेण्याचे कार्य त्यांनी केले. राज्य कारभार कसा करावा, याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. तर महात्मा फुले यांनी वंचित, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. संविधानाच्या माध्यमातून समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्याचे रामबाण उपाय फक्त संविधानातच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र अलौकिक आहे. कर्मचारी संघटनेच्या रास्त मागण्यावर राज्य शासन नेहमीच सकारात्मक आहे. यापुढेही मागण्यावर राज्य शासन कार्यवाही करेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बडोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर, इंदू मिल येथील स्मारक यासारखे विषय मार्गी लावले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व पातळीपर्यंत पोचविण्याचे काम राज्य शासन करत आहे.
यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका जाती, समाजापुरते मर्यादित नसून त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावरचे होते. आर्थिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. ब्रिटीशांच्या मंत्रिमंडळात असतानाचे त्यांचे कार्य आजही दिशादर्शक आहे.
शिक्षित लोकांनी समाजातील मागासलेल्या लोकांना मदत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या जीवनात आचरणात आणावेत. तसेच त्यांचे समता व स्वातंत्र्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवावेत, असे आठवले यांनी यावेळी सांगितले. महापौर श्रीमती आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष वानखेडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment