प्रस्ताविलेल्या सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कला व संस्कृतीसाठी तरतूदी ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2016

प्रस्ताविलेल्या सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कला व संस्कृतीसाठी तरतूदी !

मुंबई / प्रतिनिधी / 21 May2016 - चित्रकलाचित्रपटसंगीतअभिनय अशा नानाविध क्षेत्रातील दिग्गज कलाकार आणि त्यांच्या कलांना भरभरुन प्रतिसाद देणारे रसिकाग्रणी मुंबईकर यांचे अत्यंत अतूट असे नाते आहेयाचमुळे ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई शहर म्हणजे अनेक कला आणि कलाकारांचे माहेरघर मानले जातेया सर्व बाबी लक्षात घेऊन आता आपल्या बृहन्मुंबई महापालिकेने देखील सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये कला व संस्कृती विषयक बाबींसाठी विशेष तरतूदी करण्याचा प्रयत्न केला आहेयामध्ये प्रामुख्याने वाहतूकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे रस्त्यालगतचा भागचौकउद्याने यासारख्या सार्वजनिक मोकळ्या जागांमधील खुल्या भागांचा उपयोग विविध कला व संस्कृती विषयक अभिव्यक्ती करिता व्हावायासाठी आवश्यक ती तरतूद करण्याचा प्रयत्न केला आहे.


मुंबईतील सुविख्यात जहांगीर आर्ट गॅलरी जवळील पदपथावर महापालिकेच्या `विभागाच्या पुढाकाराने गेली काही वर्षे खुल्या आर्ट गॅलरीचा प्रयोग यशस्वीप्रकारे राबविण्यात येत आहेया आर्ट गॅलरीमुळे अनेक नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ प्राप्त झाले आहेतर महापालिकेच्या `डीविभागाच्या पुढाकाराने गिरगाव चौपाटी जवळील तुलसीदास किलाचंद उद्यानामध्ये नवोदित संगीत साधकांना त्यांची कला पेश करण्यासाठी महापालिकेने संधी उपलब्ध करुन दिली आहेयाच धर्तीवर आता विविध सार्वजनिक ठिकाणी कला व संस्कृती विषयक अभिव्यक्तींसाठी जागा उपलब्ध व्हावीयासाठी सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक ती तरतूद करण्याचा प्रयत्न बृहन्मुंबई महापालिकेने केला आहे.

शैक्षणिक इमारतींच्या किंवा वारसा इमारतींजवळ लोकांची अधिक ये-जा असतेही बाब लक्षात घेऊन त्या जवळचे चौकवाहतूकीला अडथळा होणार नाही अशा प्रकारे रस्त्यालगतची जागा किंवा उद्यानांमधील खुली जागा यासारख्या सार्वजनिक ठिकाणी तेथील प्रमुख उपक्रमामध्ये कोणताही अडथळा न आणता कला व संस्कृती विषयक उपक्रमांना तात्पुरत्या स्वरुपात परवानगी देण्याची तरतूद प्रस्तावित करण्याचा प्रयत्न सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावली मध्ये करण्यात आला आहे.

कला व संस्कृती संबंधी अभिव्यक्ती ही केवळ कला दालनांच्या,सभागृहांच्या तसेच संग्रहालयांच्या चार भिंतीत न राहता ती सार्वजनिक ठिकाणी येऊन जनसामान्यांपर्यंत पोहचावीया दृष्टीने सुधारित प्रारुप विकास नियंत्रण नियमावली मध्ये सदर प्रयत्न करण्यात आला आहेया अंतर्गत प्रामुख्याने चौकरस्त्यालगतचा भागउद्याने या सारख्या सार्वजनिक मोकळ्या जागांचा वापर कला व संस्कृती संबंधी बाबींसाठी करण्याचा विचार आहेयामुळे मुंबई महानगरीच्या सौंदर्यामध्ये भर पडण्यासोबतच नवोदित कलाकारांना त्यांची कला लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ देखील उपलब्ध होऊ शकणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad