मुंबई- मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागताच भाजप-शिवसेनेत पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरू झाले आहे. मुंबईतील भाजपचे नेते व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर एका कार्यक्रमात खोचक टिप्पणी केल्यानंतर शिवसेनेने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईतील वाघ आता संपले असून, आता गल्ली गल्लीत फक्त सिंहच दिसतील असे वक्तव्य प्रकाश मेहता यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते.
मुंबईतील कर्नाक बंदर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मेक इन इंडिया'चे प्रतिक असलेल्या सिंहाचं अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्य़मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाश मेहतांनी गुजराती भाषेत शिवसेनेला टोला लगावला होता. त्याला शिवसेनेने पोस्टरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केल्यानंतर प्रकाश मेहता यांच्या घाटकोपर परिसरात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रातोरात पोस्टर लावत मेहतांना उत्तर दिले आहे. वाघाच्या उपकारांवरती माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल... अशा आशयाचे पोस्टर सेनेच्या कार्यकर्त्यांनी आता घाटकोपर परिसरात लावली आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेत पुन्हा एकदा पोस्टर वॉर सुरु झाल्याचे मानले जात आहे. याचसोबत आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सिंहाच्या नरडीचा घोट घेणा-या वाघाचा फोटो छापत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
No comments:
Post a Comment