मुंबई महापालिकेत दीडशे कोटीचा गाळ आणि डेब्रिज घोटाळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2016

मुंबई महापालिकेत दीडशे कोटीचा गाळ आणि डेब्रिज घोटाळा

महापालिका उपायुक्त भरत मराठे चौकशीच्या फेऱ्यात 
अतिरिक्त आयुक्तांनी दिली माहिती
मुंबई,दि.२७ (प्रतिनिधी) – महापालिकेत दोन वर्षापुर्वी झालेल्या दीडशे कोटीच्या डेब्रिज आणि गाळ घोटाळयाप्रकरणी महापालिकेचे झोन पाचचे उपायुक्त भरत मराठे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असुन त्याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आज स्थायी समितीत दिली.

समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी आज स्थायी समितीत या घोटाळयाकडे लक्ष वेधुन त्याची स्थिती काय आहे याची विचारणा केली. रस्त्याच्याकडेला असलेला गाळ आणि डेब्रिज काढण्याचे दोन वर्षापुर्वी टेंडर काढण्यात आले होते.एम/पुर्व, एम/पश्चिम आणि एल वॉर्डसाठी या निविदा काढण्यात आल्या होत्या. ७३० दिवस हे काम करायचे होते. दीडशे कोटीच्या कामाची ही निविदा होती.पण वंâत्राटदाराने हे काम केलेच नाही. मात्र वंâत्राटदाराने सहाय्यक अभियंत्याच्या सहिने ४० टक्के अतिरिक्त पेमेंट घेतले आणि अतिरिक्त पेमेंट नियमित केले तरच नवे काम हाती घेईन अशी धमकीही या कंत्राटदाराने दिली. त्यानंतर झोन पाचचे तत्कालिन उपायुक्त भारत मराठे यांनी हे पेमेंट नियमित केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे काय? असेल तर चौकशी कुठपर्यंत आली ? असा सवाल रईस शेख यांनी केली. त्यावर या प्रकरणात तथ्य आहे. त्यामुळे याप्रकरणाची घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्तांमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे संजय देशमुख यांनी स्पष्ट केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad