मुंबई / प्रतिनिधी - ना. म. जोशी पूर्व मार्गावरील चिंचपोकळी परिसरातील नागरिकांना गेली अनेक वर्षांपासून कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. पण आता नवीन दोन पंम्पिंग स्टेशन कार्यान्वित होत असल्याने ऑर्थर रोड ते करीरोड नाका या भागातील नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा होईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज (दिनांक २१ मे, २०१६) ना. म. जोशी मार्गावरील जी/दक्षिण विभाग कार्यालयाजवळील जीवन चौकी येथे दोन पंम्पिंग स्टेशनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका किशोरी पेडणेकर, माजी महापौर महादेव देवळे, जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे, माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ना. म. जोशी मार्गावरील पूर्वेकडील नागरिकांना कमी दाबाने व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते. महापौर आंबेकर यांनी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी निर्देश देऊन यासाठी पाठपुरावा केला होता. या भागात दोन पंम्पिंग स्टेशन कार्यान्वित होत असल्याने इमारतीतील नागरिकांनाही आता उच्च दाबाने व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. हापौरांसह सर्व मान्यवरांचे ना. म. जोशी मार्गावरील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल नागरिकांनी स्वागत केले आहे.
No comments:
Post a Comment