मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा रेतीबंदर येथे ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून महापालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव व स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक १६ मे, २०१६) सकाळी एका पंपाची प्रायोगिक चाचणी करण्यात आली. याप्रसंगी संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.
संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (प्रभारी) लक्ष्मण व्हटकर यांनी कामाच्या सध्यस्थितीची माहिती मान्यवरांना यावेळी दिली. पर्जन्य जल उदंचन केंद्रामध्ये सहा पंप बसविण्यात आले असून यापैकी एका पंपाची प्रायोगिक चाचणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. एका पंपाव्दारे प्रति सेंकद सहा हजार लिटर पाण्याचा निचरा होणार असून यामुळे हिंदमाता परिसराला पाणी तुंबण्यापासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे व्हटकर यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच पर्जन्य जल उदंचन केंद्राची बांधकाम करणारी कंपनीच सात वर्ष या स्टेशनचे परिरक्षण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ब्रिटानिया पंम्पिंग स्टेशनमुळे रे रोड रेल्वे स्थानकाजवळ, दिनशॉ पेरीट मार्ग, हिंदमाता, जीजीभॉय मार्ग, अभ्युदय नगर, सरदार हॉटेल, दत्ताराम लाड मार्ग, मडकेबुवा चौक, लालबाग, काळाचौकी, स्टार सिनेमा, भायखळा स्टेशन (पूर्ण), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग व आचार्य दोंदे मार्ग जंक्शन या १३ पाणी भरणाऱया ठिकाणांना दिलासा मिळणार असल्याचे संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (प्रभारी) लक्ष्मण व्हटकर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment