मुंबई / प्रतिनिधी 23 May 2016
मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला गेला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे काम खासगी कंपनीला देण्यास महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी विरोध केला असून तसे पत्र महापालिका आयुक्तांना लिहिले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापनाचे काम एका खासगी कंपनीला दिले जाणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून 3 शिफ्टमध्ये 3 व्यक्ती काम करणार आहेत. या 3 व्यक्तींची शैक्षणिक पात्रता 10 वी पर्यंत आहे. आप्तकालीन व्यवस्थापन विभागातील या 3 व्यक्तींकडून मिळणारी माहिती संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता यांना पाठविली जाणार आहे. महापालिकेचा आप्तकालीन विभाग सर्वात महत्वाचा विभाग असून याच विभागातून आप्तकालीन परिस्थितीत माहिती वॉर्डात आणि लोकांनाही उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे संबंधित विभागाचे खासगीकरण करण्यात येवू नये, अशी मागणी छेडा यांनी आयुक्तांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment