नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2016

नालेसफाईची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश !

यापुढे कधीही अचानक भेट देऊन करणार नालेसफाई कामांची पाहणी !
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची सर्व कामे ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार व सुयोग्यप्रकारे पूर्ण करावीत असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित उपायुक्त, संबंधित खातेप्रमुख व संबंधित अधिकारी यांना दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांची पाहणी पुढील आठवड्यापासून अचानकपणे करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी सूचित केले आहे. शहर व दोन्ही उपनगरांतील नालेसफाईची कामे महापालिकेद्वारे सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यानुसार पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची पाहणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज (दिनांक १० मे, २०१६) केली, त्याप्रसंगी महापालिकेच्या अधिका-यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आज केलेल्या पाहणीत महापालिका आयुक्त यांनी वांद्रे (पूर्व) येथील चमडावाडी नाला, सांताक्रूझ परिसरातील एअरपोर्ट नाला, विलेपार्ले परिसरातील श्रध्दानंद नाला, जोगेश्वरी पूर्व भागातील मजासनाला व वाकोला नदी इत्यादी ठिकाणी सुरु असलेल्या नालेसफाई कामांची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली. या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी नालेसफाई कामे निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत, असे आदेश संबंधित अधिका-यांना दिले. तसेच आजचा पाहणी दौरा हा पूर्वनियोजित होता, मात्र यापुढे कधीही अचानकपणे भेट देऊन नाले सफाई कामांची पाहणी करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी आजच्या पाहणी दौ-यादरम्यान सूचित केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त रमेश पवार, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) लक्ष्मण व्हटकर व इतर अधिकारी या पाहणी दौ-यादरम्यान सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad