मुंबई / प्रतिनिधी - मागील वर्षी लेप्टोस्पायरेसीसने मुंबईकर हैराण झाले होते. कित्येकांना आपला जीवही गमावावा लागला होता. याची धास्ती महा पालिकेने घेत लेप्टोस्पायरासीसचा फैलाव होउ नये, म्हणून कडक पाउल उचलले आहेत. लेप्टोस्पायरासीस होउ नये, म्हणून तबेलावाल्यांना खास सुचना महापालिकातर्फे देण्यात आल्या असून काहींना नोटीस बजावून स्वच्छता राखण्यासोबत ड्रेनेज लाइन करण्यासही सांगण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुदंन यांनी दिली.
आय.ए.एस. कुंदन यांची नियुक्ती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर झाल्यानंतर पहिल्यांदा त्या पत्रकारांशी बातचीत करताना बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिकेच्या विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या 84 अतिधोकादायक इमारतींना खाली करण्याची नोटीस बजावून त्या खाली करण्यात आलेल्या आहेत. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींची संख्या 23 असून खासगी इमारतींच्या संख्या 633 असून या इमारती तातडीने खाली करण्याची नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. यासोबतच ज्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे काम आहे, अशा खासगी इमारतींची संख्या 2 हजार 57 असून महापालिका इमारतींची संख्या 480 आहे. तर त्याहून कमी दुरुस्तीचे काम असलेल्या महा पालिकेच्या इमारतींची संख्या 270 आहे. तर खासगी इमारतींची संख्या 585 आहे.
त्यांनी असेही सांगितले की, मुसळधार पाउस आणि भरती दरम्यान मुंबईत पाणी साचते अशावेळी सरकारी कार्यालयांमधील कर्मचार्यांना टप्प्या टप्पाने सोडण्यात येणार आहे. असेच खासगी कार्यालयांनाही सांगितले जाणार आहे. जेणेकरुन एकदम कार्यालय सुटल्याने रेल्वे ठिकाणी गर्दीचा ताण येणार आणि रस्तावर वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. दरड कोसळण्याची ठिकाणे 284 आहेत.
हिंदमाता आणि आसपासच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ब्र्रिटानिया पंप्मिग स्टेशनचे काम सुरु करण्यात आले होते. पंप्मिग स्टेशनचे काम येत्या 15 जून पर्यंत पूर्ण होईल. तर गझर बंद पंप्मिग स्टेशनचे काम डिसंेबरपर्यंत पूर्ण होईल तर मोगरा नाला येथे साचणार्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप्मिग स्टेशन प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

No comments:
Post a Comment