४० टक्के मुंबईकरांना पाण्याची अंदाजित बिले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2016

४० टक्के मुंबईकरांना पाण्याची अंदाजित बिले

महापालिकेकडून मुंबईकरांची फसवणूक 
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईकरांना पाणीपुरवठा करताना पाठवण्यात येणारी ४० टक्के बिले प्रत्यक्ष वापरावर न बनवता अंदाजित रकमेच्या आधारे बनवली जात असल्याचे महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी तयार केलेल्या सन २०११-१२च्या वार्षिक लेखा अहवालात उघड झाले आहे. ४० टक्के ग्राहकांना पाठवण्यात येणा-या अंदाजित बिलांमुळे मुंबईकर नागरिकांची महापालिकेकडून खुलेआम लूट सुरू असल्याचे या आह्वालावरून समोर आले आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी तयार केलेल्या सन २०११-१२च्या वार्षिक लेखा अहवालात ही बाब समोर आली आहे. यंदा सुमारे ४०.५ टक्के इतकी बिले ही प्रत्यक्ष वापराच्या आधारावर किंवा गृहितांवर बनवली नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. जलअभियंता विभागाने सन २०११-१२ या वर्षात पाण्याची बिले तयार करण्यासाठी सुमारे ४२ लाख १६ लाख १५२ वेळा मोजणी केली. यात प्रत्यक्ष जलमापकांच्या आधारे २५ लाख २७ हजार ६५६ वेळा मोजणी केली तर १६ लाख ८८ हजार ४९६ वेळा अंदाजित पाणी वापराची बिले बनवल्याचे म्हटले आहे.
या वर्षात महापालिकेने बसवलेल्या जलमापकांची संख्या १९ हजार ९२६वरून १८ हजार ६९७ आली आहे. मुंबईत ग्राहकांना पााणीपुरवठा करताना पाणी वापराचे अचूक मोजमाप घेता यावे, यासाठी जलमापके बसवण्यात आली आहेत. सन २०११-१२मध्ये अशाप्रकारे एकूण ३ लाख ५१ हजार ३४६ जलमापके बसवल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. यात स्वयंचलित जलमापके ही केवळ ६८ हजार ५०१ होती.
तर महापालिकेच्या जलमापकांची संख्या १८ हजार ६९७ इतकी आहे. उर्वरित २ लाख ५४ हजार ३१५ खासगी जलमापके जलजोडणीवर जोडलेली आहेत. या वर्षात पालिकेच्या जलमापकांची (एएमआर मापकसहित) संख्या १३ हजार १८२ ने वाढून जलमापन भाडय़ाच्या स्वरूपात मिळणा-या उत्पन्नात मागील वर्ष सन २०१०-११च्या तुलनेत १०.६९ लाखांनी घट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad