मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण करतानाच ११ नवीन स्थानकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. या ११ पैकी बहुतांश स्थानके महाराष्ट्रातील असून, त्यामुळे कोकणातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. त्याशिवाय कोकण रेल्वे दुहेरीकरणात ११ मोठे आणि १७८ छोटे पूल, १७ रोड अंडर ब्रीज आणि १७ फाटकेही असतील बांधण्यात येतील.
मध्य रेल्वेकडून दिवा ते रोहापर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. हे काम करताना कोकण रेल्वेकडील दुहेरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव बरीच वर्षे मागे पडला होता. त्यानंतर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरपर्यंतच्या टप्प्याचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता ही स्थानके साधारपणे तीन वर्षांत बांधली जातील आणि त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कोलाड ते ठोकूरपर्यंत ६५ स्थानके असून, ११ स्थानकांची भर पडल्यास स्थानकांची संख्या ७६ होईल.
८ नोव्हेंबर २0१५ रोजी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. मात्र प्रत्यक्ष कामाला मे २०१६ नंतर सुरुवात केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे दुहेरीकरण करतानाच कोकण रेल्वेकडून आणखी ११ नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी सांगितले. ही स्थानके साधारपणे तीन वर्षांत बांधली जातील आणि त्यांच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या कोलाड ते ठोकूरपर्यंत ६५ स्थानके असून, ११ स्थानकांची भर पडल्यास स्थानकांची संख्या ७६ होईल.
नवीन ११ स्थानके : इंंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, कडवई, कलवणी, पोमेंडी, वेरवली, खारेपाटण, अचिर्णे, मिरझण, इनान्जे.
No comments:
Post a Comment