मुंबई, दि. १९ : उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांसाठी डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवार २१ मे, २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते,
गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर,लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राज पुरोहित, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथालय संचालनायाच्या वतीने सन २०१३-१४ साठी खालीलप्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” शहरी विभागासाठी-
(१) श्री.शारदा वाचनालय, गोंदिया (२)श्री.विठ्ठलनाथ संस्थान संचलित गीता ग्रंथालय, विरार, (३)कै.सौ.मंगला रघुनाथ केडगे वाचनालय, सांगली(४)डॉ.शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर
ग्रामीण विभागासाठी- (१)शिवाजी सार्वजनिक वाचनालय,मांगले (२) जि.सांगली, विकास वाचनालय,लोणी,जि.पुणे(३)श्री.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, शिवपूर, लातूर (४) कै.लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय, टोकवाडी,जि.बीड यांची निवड करण्यात आली आहे.
‘डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ खालीलप्रमाणे
(राज्यस्तर) कार्यकर्ता (श्री.राम हनमंतराव देशपांडे,अमरावती) सेवक (श्री.आत्माराम बाबुराव कांबळे, लातूर) (विभाग स्तरावरील कार्यकर्ता-(१) अमरावती-श्रीमती अरूणा सदाशिव कुल्ली, बुलढाणा (२) औरंगाबाद-श्री.देवीदास भगवानराव देशपांडे, औरंगाबाद (३)नागपूर-ॲड.डॉ.श्रावण किसनजी उके, गोंदिया (४)नाशिक-श्री.सतिश उत्तमराव पाटील, धुळे (५)पुणे-श्री.रमेश धोंडिबा सुतार, पुणे (६)मुंबई-श्री.नागेश मधुकर कुलकर्णी, अलिबाग (रायगड) (विभाग स्तरावरील सेवक- (१) अमरावती-श्री.प्रमोद आनंदराव वानखडे, अमरावती (२) औरंगाबाद-श्री.सुर्यकांत महालिंग शिरसे, लातूर (३) नागपूर-श्री.निरंजन दयाराम शिवणकर,भंडारा (४) नाशिक-श्री.राजेश वामन शिरसाट, नाशिक (५) पुणे-श्री.विठ्ठल डोमाजी क्षिरसागर, पुणे (६) मुंबई- श्री.भालचंद्र भाऊ वर्तक, अलिबाग (रायगड)
रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment