मुंबईमधे पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनच जबाबदार - सत्ताधारी शिवसेनेने आपली जबाबदारी ढकलली प्रशसनावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2016

मुंबईमधे पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनच जबाबदार - सत्ताधारी शिवसेनेने आपली जबाबदारी ढकलली प्रशसनावर

मुंबई / प्रतिनिधी 17 May 2016
नालेसफाई योग्य रित्या झाली नसल्याने मागील वर्षी  मुंबई तुंबली होती. नालेसफाईमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने सत्ताधारी शिवसेना घाबरली असून यावर्षी पाणी तुंबल्यास याची जबाबदारी संपूर्णपणे पालिका प्रशासनाची आणि आयुक्तांची असेल असे पत्रच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना दिले आहे.


मागील वर्षी नाले सफाई बाबत प्रश्न उपस्थित होऊन भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याचे समोर आले आणि दोषी कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. नालेसफाई योग्य रित्या झाली नसली तरी नालेसफाई चांगली झाल्याचे सांगणाऱ्या  सत्ताधारी शिवसेनेला नालेसफाईचे प्रकरण चांगलेच भोवले असून शिवसेनेची नाचक्की झाली आहे. यामुले यावर्षी पुन्हा असे प्रकार घडल्यास पुढील वर्षी होणार्या निवडणुका लढवणे मुश्किल होणार असल्याने   शिवसेनेने नालेसफाईची सर्व जबाबदारी प्रशासनावर ढकलली आहे.

पालिका आयुक्तांवर जबाबदारी ढकलताना प्रशासनाने  कोणत्या नाल्याचा दौरा करावा हे ठरवल्यास नालेसफाईचा दौरा करता येईल असे महापौरानी कळविले आहे. यामुले प्रशासन जे नाले दाखवणार तेच नाले सत्ताधारी पाहणार का ? असा प्रश्न विचारल्यावर आम्ही नालेसफाईची अचानक पाहणी करणार असल्याचेही महापौर आंबेकर यांनी खुलासा केला आहे.

मित्रपक्षावर विश्वास नाही महापौरानी आयोजित पत्रकार परिषदेत सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आपल्या मित्र पक्षावर आता विश्वास नसल्याचे म्हटले आहे. सध्या वातावरण बिघडले असून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी उद्दंचन केंद्राच्या पाईपलाइनमधे मित्र पक्ष गाद्या आणि कचरा टाकुन पाणी तुंबवू शकतो असा आरोप केला आहे. मुंबईमधे पाणी तुंबू नए म्हणून वेळ पडल्यास पक्षातील शाखाप्रमुख शिवसैनिकाना रस्त्यावर उतरवून मुंबईकर नागरीकाना दिलासा देवू असे विश्वासराव यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad