खासदार रामदास आठवले यांचा बांगलादेश दौरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2016

खासदार रामदास आठवले यांचा बांगलादेश दौरा

मुंबई -- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले  हे उद्या दि 29 मे पासून  बांगलादेशच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. बांगलादेश मधील पिरोजपुर जिल्ह्यातील जलबारी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन 29 मे रोजी खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे दि 29मे ते 1 जून पर्यंत खासदार रामदास आठवले हे बांगलादेश च्या दौऱ्यावर असून या दरम्यान ते बांगलादेशातील विविध शहरांना भेटी देनार आहेत. तसेच बांगलादेशातील बौद्ध विचारवंत बौद्ध भिक्खू आणि संघटनांशी ते चर्चा करणार आहेत महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांच्या नेतृत्वात तेथील नामशूद्र दलितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत निवडून दिले होते महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांच्या जन्मगावी खासदार रामदास आठवले भेट देणार आहेत तसेच बांगलादेशच्या पंतप्रधानांचीसुद्धा खासदार रामदास आठवले भेट घेणार आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad