मुंबई - कांदिवली पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ मुंबई कॉंग्रेसतर्फे आयोजित 'बीएमसी चा पोल खोल' हि सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अचानक काही शिवसैनिक आले व त्यांनी निदर्शने करीत दगडफेक केली. मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी मुंबई कॉंग्रेसने मुंबईत ठीक ठिकाणी 'बीएमसी चा पोल खोल' हि सभा आयोजित केलेली आहे. काल हि सभा कांदिवली पूर्वेला सुरु असताना शिवसैनिकांनी दगडफेक केली, या दादागिरीचा व गुंडगिरीचा मुंबई कॉंग्रेसतर्फे आम्ही कडक शब्दात निषेध करतो, असे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
ते पुढे म्हणाले कि दगडफेक करणार्यांवर ताबडतोब कारवाई करावी तसेच त्यांच्यावर कडक कलम पोलिसांनी लावावेत, अशी आमची मागणी आहे. शिवसैनिकांच्या या दादागिरीला आम्ही न घाबरता 'बीएमसी का पोल खोल' हि सभा करतच राहणार आहोत आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्यांची शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांची नावे उघडपणे जाहीर करणारच. मुंबईच्या जनतेला कळू दे कि शिवसेना आणि भाजपाने किती व कसा भ्रष्टाचार केलेला आहे.
ते पुढे म्हणाले कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांची जबाबदारी आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने 'बिएमसी का पोल खोल' हा कार्यक्रम करीत आहोत, तेव्हा त्यांनी दगडफेकीचे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी जातीने लक्ष घालून असे प्रकार पुन्हा होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.
No comments:
Post a Comment