नवी दिल्ली दि. 26 : ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ या विशेष अभियानाअंतर्गत गुरुवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रतिज्ञा घेण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना, “मी शपथ घेतो की, मी स्वत: स्वच्छतेप्रती सजग राहील आणि त्यासाठी वेळ देईल. आठवड्यातून २ तास अशा प्रकारे प्रत्येक वर्षी १०० तास श्रमदान करून स्वच्छतेचे व्रत प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करेल ......” अशी ‘स्वच्छ भारत पंधरवड्या’ची प्रतिज्ञा दिली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय,सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, डॉ. किरण कुलकर्णी, अजितसिंग नेगी, संजय आघाव यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘स्वच्छ भारत पंधरवड्या’ निमित्त प्रतिज्ञा
महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘ स्वच्छ भारत पंधरवडा’ या विशेष अभियानाअंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचा-यांना ‘स्वच्छ भारत पंधरवड्या’ ची प्रतिज्ञा दिली.
No comments:
Post a Comment