मुंबई, दि. 18 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुणे येथे ʽआंबेडकरी जलसाʼ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. २१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता बी.जे.वैद्यकिय महाविद्यालय मैदान येथे सादर केला जाणार आहे.
यावेळी महाराष्ट्रातील कलाकार उर्मिला धनगर, नंदेश उमप,प्रसन्नजीत कोसंबी, विजय गटलेवार, नागसेन सावदेकर, योगेश चिकटगावकर, शाहीर कुणाल वराळे आणि विनायक सैद हे आपली कला सादर करणार आहेत. बुद्धवंदना, आंबेडकरी नमन, कीर्तन, बतावणी,भारुड, पोवाडा, गोंधळ आणि मूकनाट्य असे कलाप्रकार या भरगच्च कार्यक्रमात सादर होतील.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाची प्रवेशिका १) बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह, मालधक्का, पुणे स्टेशन रोड ३) सावित्रीबाई फुले नाट्यगृह,भवानी पेठ ४) अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, सातारा रोड ५) पं.भीमसेन जोशी नाट्यगृह, औंध ६) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment