राज्यातील 95 हून अधिक उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 May 2016

राज्यातील 95 हून अधिक उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली

मुंबई - राज्यातील 95 हून अधिक उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या परीक्षेतील कामगिरीत राज्याने सातत्य राखले आहे. या वर्षी मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी निवडीच्या वेळी आरक्षित जागांच्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याने खुल्या प्रवर्गाचा "कट ऑफ‘ वाढला होता. त्या तुलनेत राज्याची कामगिरी चांगली असल्याचे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून राज्य सरकारने सुरू केलेल्या "क्षमता विकास कार्यक्रमा‘मुळे राज्यातील 37 विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता आले आहे. 

2013 पासून यूपीएससी परीक्षा "सीसॅट पॅटर्न‘वर आधारित आहे. यंदाही हाच पॅटर्न होता, मात्र अंतिम मुलाखतींसाठी दरवर्षी एका पदासाठी 3 ते 4 जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. त्याऐवजी यंदा एका पदासाठी सरासरी दोन जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. "राज्यात यश मिळवलेल्यांची संख्या 95च्या पुढे असल्याने जे रॅंकर्स महाराष्ट्रातील आहेत; पण ज्यांनी अन्य केंद्रांवरून परीक्षा दिली आहे, असे उमेदवार यंदा शंभराहून अधिक असण्याची शक्‍यता आहे. 


राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाद्वारे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम 2015 मध्ये सुरू झाला. यात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अभिरूप मुलाखत आणि व्याख्यानांतून दिल्लीत विशेष प्रशिक्षण देण्यात येते. या अभिरूप मुलाखतींद्वारे यंदा 120 उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले. त्यापैकी 37 विद्यार्थ्यांना यश मिळवता आले, अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad